स्पॉटबॉय, हेअर स्टायलिस्ट ते तब्बूच्या साड्यांना इस्त्री करण्यापर्यंत रोहित शेट्टीनं केली 'ही' कामं

Rohit Shetty : रोहित शेट्टीचा आज वाढदिवस आहे. आज रोहितला सगळे ओळखत असतील आणि त्याच्यासोबत काम करण्यासाठी सगळेच उत्सुक असले तरी त्यांनं सुरुवातीला खूप स्ट्रगल केलं आहे. त्याविषयी त्यानं एका मुलाखतीत खुलासा केला होता.

दिक्षा पाटील | Updated: Mar 14, 2024, 04:36 PM IST
स्पॉटबॉय, हेअर स्टायलिस्ट ते तब्बूच्या साड्यांना इस्त्री करण्यापर्यंत रोहित शेट्टीनं केली 'ही' कामं title=
(Photo Credit : Social Media)

Rohit Shetty : बॉलिवूडचा लोकप्रिय अॅक्शन दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आज 14 मार्च रोजी 50 वा वाढदिवस आहे. रोहित शेट्टीचं नावं हे बॉलिवूडमधील टॉपच्या काही दिग्दर्शकांमध्ये घेतले जाते. आज त्यांच्यासोबत काम करण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. पण तुम्हाला माहितीये का की रोहित शेट्टीला इथवर पोहोचण्यासाठी त्याला खूप स्ट्रगल करावं लागलं. तुम्हाला माहित नसेल तर रोहित शेट्टी हा लोकप्रिय अभिनेता आणि स्टंट डायरेक्टर एमबी शेट्टी यांचा मुलगा आहे. त्यांच्या निधनानंतर रोहित आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबानं अनेक गोष्टींचा सामना केला. सेव्हिंगमधील सगळे पैसे संपल्यानंतर रोहितला त्याचं शिक्षण सोडावं लागलं कारण त्याच्यावर आई आणि बहिणींची जबाबदारी होती. त्याविषयी रोहितनं एका मुलाखतीत खुलासा केला.

रोहितचे फक्त वडील हे स्टंट डायरेक्टर नव्हते तर आईही याच क्षेत्रातून होती. त्याची आई रत्ना शेट्टी या चित्रपटांमध्ये स्टंटवूमनचं काम करायच्या. पती एमबी शेट्टी यांच्या निधनानंतर त्यांनी पुन्हा या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 'सीता और गीता' या चित्रपटात त्यांनी हेमा मालिनी यांच्या बॉडी डबलची भूमिका साकारली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रोहितनं एकदा भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाच्या शोमध्ये त्याचं स्ट्रगल सांगितलं. त्यानं सांगितलं की जेव्हा त्याच्या वडिलांचं निधनं झालं आणि आईकडे असलेली सगळी सेव्हिंग्स संपली तेव्हा ते त्याच्या आजीकडे रहायला गेले. रोहितनं शेट्टीनं घर चालवण्यासाठी शिक्षण सोडलं आणि छोटी-मोठी कामं करु लागला. रोहित शेट्टीनं सांगितलं त्याचा पहिला पगार हा 35 रुपये होता. तर त्यानं स्पॉटबॉय पासून हेयर ड्रेसरपर्यंत अनेक कामं केली आहेत. रोहित शेट्टीनं 'हकीकत' या चित्रपटाच्या सेटवर तब्बूच्या साड्यांना इस्त्री केली होती. इतकंच नाही तर त्यानं काजोलचा हेयर ड्रेसर म्हणून देखील काम केले.

हेही वाचा : मलायकाचा ड्रेस पाहून चिडल्या किरण खेर; अभिनेत्री सडेतोड उत्तर देत म्हणाली; 'पाय आहेत तर...'

त्यानंतर रोहित शेट्टीनं त्याचे वडिलांचे स्टंट गुरु विरासत यांची भेट घेतली. त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी असिस्टंट डायरेक्टर म्हणून कामाला सुरुवात केली. त्याचा पहिला चित्रपट हा 'फूल और कांटे' होता. हा अजय देवगणचा डेब्यू चित्रपट होता. काही वर्षे असिस्टंट म्हणून काम केल्यानंतर 2003 मध्ये रोहितनं 'जमीन' या चित्रपटातून एक दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतर त्याच्यासोबत काम करण्यासाठी कोणीही तयार नव्हतं. तेव्हा अजयनं त्याला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी एकत्र अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्याची सुरुवात ही फिल्म 'गोलमालः फन अनलिमिटेड' या चित्रपटापासून झाली.