Sara Tendulkar | काय आहे सारा तेंडुलकरच्या सौंदर्याचं रहस्य?

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर एक्टिव्ह असते.

Updated: Dec 24, 2021, 10:18 PM IST
Sara Tendulkar |  काय आहे सारा तेंडुलकरच्या सौंदर्याचं रहस्य? title=

मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी(Sachin Tendulkar Daughter) सारा तेंडुलकर (Sara Tendulkar)  सोशल मीडियावर एक्टिव्ह असते. साराचे फोटो चाहत्यांना खूप आवडतात.  साराच्या फिटनेसच्या बाबतीतही तोड नाही. साराने काही दिवसांपूर्वीच मॉडेलिंगमध्ये पदार्पण केलं होतं. आता तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिच्या सौंदर्याच रहस्य सांगितलं आहे. (former team india cricketer sachin tendulkar daughter sara tendulkar beauty product instagram post) 

साराची पोस्ट 

साराने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती सुंदर दिसतेय. साराने एका ब्यूटी प्रॉडक्ट्सचं जाहिरात करताना दिसतेय. साराने या  फोटोमध्ये या ब्यूटी प्रॉडक्टबाबत माहिती दिली आहे.

"हे प्रॉडक्ट त्वचेला हायड्रेटेड होण्यापासून संरक्षण करतं. यामुळे त्वचा ग्लो करते. या प्रोडक्टमुळे माझ्या स्क्रीनचंही संरक्षण होतं",  साराने अशी कॅप्शन दिली आहे. या पोस्टवर नेटीझन्सनेही भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.