श्रद्धा कपूर पहिल्यांदाच करणार या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत काम

आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करणारा राजकुमार राव याच्या नव्या सिनेमाची घोषणा झाली आहे. त्याचा आगामी सिनेमा हॉरर कॉमेडी जॉनरचा सिनेमा आहे. 

Updated: Jan 12, 2018, 10:25 AM IST
श्रद्धा कपूर पहिल्यांदाच करणार या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत काम  title=

मुंबई : आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करणारा राजकुमार राव याच्या नव्या सिनेमाची घोषणा झाली आहे. त्याचा आगामी सिनेमा हॉरर कॉमेडी जॉनरचा सिनेमा आहे. 

श्रद्धासोबत पहिल्यांदाच

राजकुमार राव हा सध्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमांसाठी डिमांडमध्ये आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचाही बोलबाला आहेच. सध्या ती प्रभाससोबत ‘साहो’चं शूटिंग करत आहे. आता ती राजकुमार रावसोबत या नव्या सिनेमात दिसणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या सिनेमाचं ‘स्त्री’ असं टायटल असणार आहे. 

राजकुमारने केलं ट्विट

ट्विट करून राजकुमार राव याने ही माहिती दिली. त्यात त्याने लिहिले की, ‘आता आमच्याकडे सिनेमाचं नाव आहे. हॉरर कॉमेडी ‘स्त्री’चं शूटिंग सुरू. शूटिंग रोमांचक होईल. या सिनेमाचं दिग्दर्शन अमर कौशिक, राज आणि डिके लिखीत, दिनेश विजन, राज आणि डिके याची निर्मिती करतील’.

कोण आहेत दिग्दर्शक?

‘स्त्री’ सिनेमाचं दिग्दर्शन ‘शोर इन द सिटी, ‘गो गोआ गॉन’,  आणि ‘हॅपी एंडिंग’ सारख्या सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेले राज आणि डिके करणार आहेत. सिनेमाच्या कथानकाबाबत अजून काही खुलासा झालेला नाहीये.