सुनिधीच्या स्वप्नासाठी वडिलांचा मोठा त्याग

वडील आणि मुलीचं नातं फार जिव्हाळ्याचं असतं.

Updated: Sep 23, 2019, 02:24 PM IST
सुनिधीच्या स्वप्नासाठी वडिलांचा मोठा त्याग title=

मुंबई : वडील आणि मुलीचं नातं फार जिव्हाळ्याचं असतं. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि मुलगी श्वेता नंदा त्याचप्रमाणे शहारूख खानची लाडकी सुहाना यांच्या चर्चा कायम रंगत असतात. अता चर्चा होत आहे ती, म्हणजे प्रसिद्ध गायक सुनिधि चौहान आणि तिचे वडील दुष्यंत चौहान यांच्या प्रेमळ बाप लेकीच्या नात्या बद्दल. वडील आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. तर सुनिधिच्या वडिलांनी आपल्या लेकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चक्क आपल्या नोकरीचा त्याग केला. 

'द कपिल शर्मा' शोमध्ये ती उपस्थित होती. तिच्या सोबत अभिनेता संजय सुरी आणि अभिनेत्री दिव्या दत्त देखील उपस्थित होते. हे तिन्ही कलाकारांनी त्यांच्या आगामी 'झलकी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये पाहुणे म्हणून हजर होते. यावेळेस अर्चना पूरन सिंगने सुनिधिच्या संगीतमय प्रवासाचा खुलासा केला. 

सुनिधिला गायक बनवण्यासाठी तिच्या वडिलांनी देखील संघर्ष केला. आपली नोकरी सोडून ते सुनिधिला गायक बनवण्यासाठी मुंबईत घेवून आले होते. अर्चना म्हणाली की, 'सुनिधिला तिच्या वडिलांचा कायम पाठींबा होता. त्यामुळे ती आज एक यशस्वी गायिका आहे. जेव्हा मी सिंगिग शोचं सुत्रसंचालन करत होती तेव्हा सुनिधि फार लहान होती. माझा हात धरून ती मंचावर यायची.' 

'झलकी' चित्रपट २७ सप्टेंबर रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ब्रह्मानंद एस सिंह यांनी केले आहे. एका ९ वर्षांच्या मुली भोवती या चित्रपटाची कथा फिरत आहे.