सोशल मीडियावर चर्चेत प्रियाने दिली पहिली प्रतिक्रिया

व्हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर एका तरुणीचा व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत आहे. ऑफीस, घर, कॉलेज सगळीकडे याच मुलीची चर्चा आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 13, 2018, 12:58 PM IST
सोशल मीडियावर चर्चेत प्रियाने दिली पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : व्हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर एका तरुणीचा व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत आहे. ऑफीस, घर, कॉलेज सगळीकडे याच मुलीची चर्चा आहे.

इंटरनेटवर व्हायरल 

तिच्या स्टाईलमुळे ती चर्चेत आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ती शाळेच्या यूनिफॉर्ममध्ये दिसते आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही काही न बोलता फक्त डोळ्यांच्या इशाऱ्यावर प्रेम व्यक्त करत आहेत.

पहिला सिनेमा

इंटरनेटवर चर्चेत असलेली प्रिया प्रकाश वॉरियर एका दिवसात प्रसिद्ध झाली आहे. १८ वर्षांची प्रिया वॉरियर एका मल्याळी सिनेमाची अभिनेत्री आहे. 'Oru Adaar Love' असं या सिनेमाचं नाव आहे.

प्रियाची प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासातच इंस्टाग्रामवर प्रिया वॉरियरचे लाखो फॉलोअर्स वाढले आहेत. सिनेमा रिलीज होण्याआधीच ती खूप प्रसिद्ध झाली आहे. ट्विटर आणि फेसबूकवर ती ट्रेंड करते आहे. प्रियाने यानंतर  ट्विटरवर म्हटलं की, 'सगळ्यांना गुड मॉर्निंग. मला विश्वास होत नाहीये की मी ट्रेंड करत आहे. हे प्रेम आणि तुमच्या समर्थनासाठी तुमचे आभार'.