'गली बॉय' सिनेमाचा पहिला डायलॉग प्रोमो प्रदर्शित

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलर आणि गाण्यांना चाहत्यांकडून विशेष दाद मिळाली.

Updated: Feb 4, 2019, 05:46 PM IST
'गली बॉय' सिनेमाचा पहिला डायलॉग प्रोमो प्रदर्शित title=

मुंबई: अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर सिनेमा 'गली बॉय' पहिला डायलॉग प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या डायलॉग प्रोमोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. या प्रोमोमध्ये रणवीर आणि आलिया यांच्या नात्यातील तिखट-गोड संभाषण चाहत्यांना अनुभवता येणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलर आणि गाण्यांना चाहत्यांकडून विशेष दाद मिळाली. स्ट्रीट रॅपर विवियन फर्नांडिज आणि नावेद शेख यांच्या खऱ्या जीवनावर आधारित 'गली बॉय' हा सिनेमा आहे. या सिनेमातून रॅपरचा प्रवास दाखवण्यात आला आहे. सिनेमात रणवीर एका रॅपरच्या भूमिकेत दिसणार असून आलिया मुस्लिम मुलीची भूमिका साकारत आहे.   

 

‘अपना टाइम आएगा’ या गण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले. या गाण्यामध्ये सुद्धा गरीब भागात राहणारे स्ट्रीट रॅपर कशा प्रकारे संघर्ष करतात आणि याच संघर्षाच्या बळावर उंच झेप घेण्याची इच्छा मनात कायम ठेवणाऱ्या रॅपरची गोष्ट या गाण्याच्या माध्यमातून दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#ranveersingh  #aliaabhatt

A post shared by Alia Bhatt (@aliyabhattt) on

 

‘मेरी गली में’ या गाण्याचे लेखन रॅपर डिवाइन आणि रॅपर नैजी यांनी केले. सध्या हे  दोघे गाण्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. ‘मेरी गली में’ या गाण्याने सुद्धा चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. 'गली बॉय' सिनेमा 14 फेब्रुवारीला सिनेमागृहात दाखल होणार आहे.