अक्षयच्या 'गोल्ड' सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई

किती केली ओपनिंग कमाई 

अक्षयच्या 'गोल्ड' सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई  title=

मुंबई : 72 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 2 मोठ्या स्टारचे सिनेमे प्रदर्शित झाले. या दोन्ही सिनेमांच पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर आलं आहे. बॉलिवूडमधील खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षयचा 'गोल्ड' आणि जॉनचा अब्राहमचा 'सत्यमेव जयते' या दोन्ही सिनेमांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श आणि रमेश बाला यांनी सिनेमांच कलेक्शन शेअर केलं आहे.  

अक्षय कुमारचा 'गोल्ड' हा सिनेमा स्वतंत्रता दिवसानिमित्त रिलीज झाला. या सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई ही 27 करोड रुपये इतकी झाली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने ओपनिंग रेकॉर्ड तोडला आहे. ट्रेड अनालिस्टने अक्षयच्या गोल्ड सिनेमाची कमाई ही जवळपास 18 रुपये असल्याचं सांगितलं होतं. सिनेमाची गोष्ट ही 1948 मध्ये भारताने पहिल्यांदा स्वतंत्र देश म्हणून ऑल्मपिकमध्ये सहभाग घेतला होता. भारताने इंगर्जांनी त्यांच्याच जमिनीवर हॉकी खेळून मात दिली. मात्र कालांतराने भारत हा विजय विसरला. अक्षयने 70 वर्षापूर्वी जिंकलेल्या या विजयाचा विचार केला आणि त्यावर सिनेमा बनवला.