कपिलच्या 'फिरंगी' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित !

कॉमेडियन कपिल शर्माचा दुसरा चित्रपट 'फिरंगी' चे टीजर पोस्टर लाँच झाले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 28, 2017, 04:37 PM IST
कपिलच्या 'फिरंगी' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित ! title=

नवी दिल्ली : कॉमेडियन कपिल शर्माचा दुसरा चित्रपट 'फिरंगी' चे टीजर पोस्टर लाँच झाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव ढिंगरा करत असून निर्मिती के9 फिल्म्ज करत आहे. या चित्रपटात कपिलसोबत ईशिता दत्ता आणि मोनिका गिल देखील दिसून येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटात कपिलने गाणे देखील गायले आहे. कपिलची संगीताची आवड सर्वश्रुत आहे. 

'किस किस को प्यार करूं' हा कपिलचा पहिला चित्रपट होता. 'फिरंगी' हा त्याचा दुसरा चित्रपट असून त्याचे पहिले टीजर पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. 

 

गेल्या काही दिवसांपासून कपिलची तब्बेत ठीक नसल्यामुळे तो उपचारांसाठी बंगळूरला गेला होता. तेथे त्याची आयुर्वेदीक ट्रीटमेंट चालू होती. कपिलची ही ट्रीटमेंट ४० दिवसांची असून तो १३ दिवसातच तेथून परत आला. अलीकडेच त्याने फेसबुक लाईव्ह करून सांगितले की त्याचा  'फिरंगी' हा चित्रपट १० नोव्हेंबरला  प्रदर्शित होणार आहे.