थरकाप उडवणारे परी चित्रपटाचे नवे फोटोज....

लग्नानंतर अनुष्का शर्मा नवाकोऱ्या परी या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येत आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 10, 2018, 08:11 PM IST
थरकाप उडवणारे परी चित्रपटाचे नवे फोटोज.... title=

मुंबई : लग्नानंतर अनुष्का शर्मा नवाकोऱ्या परी या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येत आहे. तिच्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक अत्यंत भयंकर होता. त्यानंतरचे टीझर्स तर अंगावर काटा आणणारे होते. आता पुन्हा एकदा परीचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ते पाहुन नक्कीच तुमचा थरकाप उडेल. चित्रपटाचे पोस्टर, टीझर्स पाहुन प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.

परीचा टीझर लोकप्रिय

टीझर पाहिल्यावर अनुष्काच्या भूमिकेची गंभीरता आणि वेगळेपण लक्षात येते. आतापर्यंत अनुष्काला या रुपात आपण कधीच पाहिले नव्हते. मात्र तिचे हे वेगळेपण लोकांच्या पसंतीस उतरत आहे. कारण चित्रपटाचा टीझर १० मिलीयनपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. टीझरनंतर अनुष्काचा हा फोटो समोर येत आहे. फोटोत अनुष्का खूप भयानक दिसत आहे. 

 

#PrernaArora #KriArjEntertainment #PariTheMovie @Regranned from @officialcsfilms - If your answer is #Pari, we cannot promise that she won’t haunt you more. #PariTeaser - (link in bio) @anushkasharma @parambratachattopadhyay @kriarj @pooja_ent @kytaproductions @iprernaarora

A post shared by Prernaa Arora (@iprernaarora) on

अनुष्काची निर्मिती

अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसतर्फे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यापूर्वी ‘एनएच१०’ आणि ‘फिल्लौरी’या चित्रपटांची निर्मिती तिच्या ्रॉडक्शन हाऊसतर्फे करण्यात आली होती. या चित्रपटात अनुष्कासोबत परमब्रता चॅटर्जीही प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रॉसी रॉय यांनी केले आहे.