प्रसिद्ध संगीतकारावर सह-कलाकाराकडून गर्भपातसह इतर गंभीर आरोप

गीतकारावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर त्याच्यावर होईल कारवाई?

Updated: Oct 15, 2021, 01:35 PM IST
प्रसिद्ध संगीतकारावर सह-कलाकाराकडून गर्भपातसह इतर गंभीर आरोप title=

मुंबई : झगमगत्या दुनियेतून पुन्हा थक्क करणारी घटना समोर आली आहे. एका महिला गीतकाराने गायक आणि संगीतकार राहुल जैनच्या विरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा आरोप आहे की तो मुलाला स्वीकारत नाही आणि मुलाला दत्तक देण्यासाठी सांगत आहे. तक्रारदाराचे वकील चंद्रकांत अंबानी यांनी ईटाइम्सला सांगितले की राहुल जैनने महिलेला दोनदा गर्भपात करण्यास भाग पाडले. आहे.

शिवाय राहुलने महिलेले दोनदा करियरचं कारण देत गर्भपात करण्यास भाग पाडले. राहुलला त्याचं नातं गुपित ठेवायतं होतं. शिवाय त्याने मुलाबाद्दल देखील कधी उघडपणे सांगितलं नाही. महिलेच्या वकिलाने या प्रकरणावर सांगितले की, मुलाच्या वडिलांचे नाव जन्माच्या प्रमाणपत्रावर नमूद केले आहे, परंतू तो आई आणि मूल दोघांनाही सोडून कुठेतरी गायब झाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एक दोन नाही तर राहुलने महिलेला तिसऱ्यांदाही गर्भपात करण्यास सांगितले होते, परंतु यावेळी महिलेने तसे करण्यास नकार दिला. यावेळी तिने तिच्या मुलाला जन्म दिला, जो आता सहा महिन्यांचा आहे. राहुल जैनवर महिलांच्या पैसे खर्च केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 

या प्रकरणाची सुनावणी आता 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. महिलेने 6 ऑक्टोबर रोजी राहुल जौनविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान 20 ऑक्टोबर रोजी आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.