माकडाच्या पिलाला आपलं बाळ मानते 'ही' लोकप्रिय गायिका

अपघातात माकडाच्या पिलानं गमावलं आईला... त्यानंतर  लोकप्रिय गायिकेने घेतली 'त्या' पिलाची जबाबदारी  

Updated: Aug 3, 2022, 11:57 AM IST
माकडाच्या पिलाला आपलं बाळ मानते 'ही' लोकप्रिय गायिका title=

मुंबई : 'हर हर शंभो...' या गाण्यामुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या फरमानी नाज (Farmaani Naaz) ला तुम्हीही ओळखत असाल. मधूर गळा आणि आवाजात असलेल्या जादूमुळे  फरमानी नाजने अनेकांची मने जिंकली. ती  'हर हर शंभो...' गाण्यामुळे लोकप्रिय तर झाली, पण वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली. आता पुन्हा फरमानी नाज चर्चेत आली आहे. फरमानी नाज एका माकडाच्या पिलाचा सांभाळ स्वतःच्या पोटच्या मुलाप्रमाणे करते. 

नाजने एक वेदनादायक घटना सांगितली आहे. ती माकडाच्या मुलाच्या सांभाळ करत आहे. तिने माकडाच्या पिलाचं नाव टिनू ठेवलं आहे. टिनू नाजच्या इतका जवळ आहे की ती त्याला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळते.

नाज म्हणाली 'मी माझ्या मुलापेक्षा जास्त प्रेम टिकूवर करते. मी त्याला कपडे घालते, त्याला दूध पाजते, जेवण भरवते.... त्याच्यामध्ये देखील भावना आहे. टिकूच्या आईचं अपघातात निधन झालं आहे. तेव्हापासून टिकू माझ्याकडे राहतो.'

नाज पुढे म्हणाली, 'मी टिकूला माझ्यासोबत झोपवते. लहान बाळ आहे. घाबरुण जाईल...', शिवाय नाज टिकूला झोपवण्यासाठी गाणं देखील म्हणते. नाज तिच्या पोटच्या मुलाप्रमाणेच टिकूची काळजी घेते.