Farhan Akhatr नं दुसरी पत्नी शिबानी दांडेकरसोबत शेअर केला फॅमिली फोटो, मुलींसोबत दिसली खास बॉंडिंग

Farhan Akhatr नं सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Jan 8, 2023, 05:42 PM IST
Farhan Akhatr नं दुसरी पत्नी शिबानी दांडेकरसोबत शेअर केला फॅमिली फोटो, मुलींसोबत दिसली खास बॉंडिंग title=

Farhan Akhatr Shared Photo Shibani Dandekar and His Two Daughters From First Wife: बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. फरहान हा त्याच्या पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत राहते. फरहान हा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच फरहाननं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. फरहाननं शेअर केलेला हा फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्य झाले आहे. 

फरहाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. फरहाननं शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याची दुसरी पत्नी शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आणि त्याच्या मुली शाक्या अख्तर (Shakya Akhtar) आणि अकीरा अख्तर (Akira Akhtar)  एकत्र असल्याचे दिसत आहे. तुम्हाला माहित नसेल तर शाक्या आणि अकिरा या दोघी फरहान अख्तरची पूर्वाश्रमीची पत्नी अधुना भबानी यांच्या मुली आहेत. फरहान आणि अधुना 2016 मध्ये लग्नाच्या 16 वर्षानंतर विभक्त झाले आणि 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. शिबानी आणि फरहानच्या लग्नाची फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेक वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर फरहान आणि शिबानीनं 19 फेब्रुवारी 2022 रोजी लग्न केले. त्या दोघांनी जावेद अख्तर यांच्या खंडाळा फार्महाऊसवर हे लग्न केले. त्यांच्या लग्नाला कुटुंबातील काही सदस्य आणि जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. फरहान आणि शिबानीनं ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले.  

दरम्यान, फरहानच्या दोन्ही मुलींना संगीताची आवड आहे. असा खुलासा फरहान अख्तरनं 2022 साली 'ETimes' ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. “दोघांना संगीताची आवड आहे. मोठी मुलगी गिटार शिकत आहे. ती UK मध्ये शिकत असून तिथल्या सिंगिग सोसायटीची एक भाग आहे.

हेही वाचा : Swara Bhaskar नं Mystery Man सोबत शेअर केला फोटो 'या' व्यक्तीला करतेय डेट

फरहान अख्तरने गोव्यात नवीन वर्षाचे स्वागत केले होते. तर आता फरहाननं शेअर केलेला फोटो पाहून नेटकरी असे म्हणत आहेत की त्याच्या दोन्ही मुली त्याच्यासोबतच होत्या. फरहाननं शेअर केलेल्या फोटोमध्ये शाक्या आणि अकीरा या दोघी सोफ्टावर बसल्याचे दिसत आहे. तर त्यांच्या पाठी शिबानी आणि फरहान उभे आहेत. शिबानीनं काळ्या रंगाचा टॉप आणि स्कर्ट परिधान केलं आहे. तर फरहाननं काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. फरहानच्या दोन्ही मुली शाक्या आणि अकिरा या दोघी खूप सुंदर दिसत आहेत.