... अन् 33 दिवसांनी शाहरुखनं स्वत: त्याला 'मन्नत'मध्ये भेटायला बोलावलं! सर्वसामान्य चाहत्याचा स्वप्नवत प्रवास

Shah Rukh Khan meet fan in Mannat : शाहरुख खान त्याच्या जबरा फॅनला चक्क मन्नतमध्ये भेटला. तब्बल 

दिक्षा पाटील | Updated: Oct 4, 2023, 04:23 PM IST
... अन् 33 दिवसांनी शाहरुखनं स्वत: त्याला 'मन्नत'मध्ये भेटायला बोलावलं! सर्वसामान्य चाहत्याचा स्वप्नवत प्रवास title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan meet fan in Mannat : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा सगळ्यांच्याच मनावर राज्य करतो. शाहरुख खानचे चाहते हे फक्त भारतात नाही तर परदेशातही आहेत. त्याची एक झलक मिळावी किंवा त्याला भेटायला मिळावं यासाठी त्याचे चाहते काय काय करतात. आता एका चाहत्यानं शाहरुखला भेटायचं ठरवलं आहे तर त्यासाठी त्याला तब्बल 30 दिवस लागले आणि अखेर शाहरुखला भेटण्याची संधी मिळाली. त्या चाहत्यानं त्याचा हा 30 दिवसांचा प्रवास दाखवला आहे. त्यानंतर तो थेट शाहरुखच्या घरी जाऊन त्याला भेटला. 

कोण आहे शाहरुखचा तो चाहता?

शाहरुखच्या या चाहत्याचे नाव आकाश पिल्लै आहे. आकाशनं शाहरुखला भेटण्यासाठी त्याच्या घराबाहेर तब्बल 30 दिवस प्रतिक्षा केली. अखेर त्याचं स्वप्न सत्यात उतरलं. आकाश पिल्लेनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शाहरुख खानचा एक फोटो शेअर केला आहे आणि अभिनेत्याचा एक डायलॉग कॅप्शनमध्ये दिला आहे. आकाशनं कॅप्शनमध्ये लिहिलं की ‘अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिश में लग जाती है.’ आकाशनं संपूर्ण प्रवासात पहिल्या दिवसापासून संघर्षाची झलक शेअर केली आहे. आज आकाशकडे अनेक आठवणी आहेत आणि त्यात मन्नतच्या बाहेर उभ राहुण शाहरुखची रोज प्रतिक्षा करणं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनाही 'या' मराठमोळ्या चित्रपटाची उत्सुकता, ट्विट करून दिल्या शुभेच्छा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेक दिवस प्रतिक्षा केल्यानंतर आकाशनं सांगितलं की कशा प्रकारे 19 व्या दिवशी यशराज फिल्म्स स्टूडियोमध्ये ‘जवान’ च्या प्रेस मीटमध्ये शाहरुख खाननं त्याला पाहिलं. व्हिडीओत त्यानं हे देखील सांगितलं की कशा प्रकारे SRK ला भेटण्याच्या प्रतिक्षेत त्याचा 19 वा दिवस आहे. बोर्डसोबत स्टूडियोमध्ये कशीबशी एन्ट्री मिळाली. तर एक आठवड्या आधी कसा तो शाहरुख खानला भेटणार होता पण संधी अचानक गेली. पोस्ट करण्याच्या काही तासात, किंग खानचे चाहते आणि आकाश पिल्लेचे फॉलोवर्सनं कमेंट करत सतत अपडेट विचारताना दिसले. आकाशनं यावेळी सांगितलं की तीन दिवस आधी शाहरुखच्या टीमनं अखेर उत्तर दिलं आहे. पोस्ट केल्याच्या काही तासांमध्ये किंग खानचे चाहते आणि आकाश पिल्लेचे फॉलोवर्सनं कमेंट सेक्शनमध्ये त्याला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काय तर, आकाशनं थेट शाहरुख खानसोबत फोटोच शेअर केला. या फोटोला 2 लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केले.