ऐश्वर्या-अभिषेकचे खोटे फोटो इंटरनेटवर व्हायरल; अभिनेत्याला द्यावं लागलं स्पष्टीकरण

ऐश्वर्या-अभिषेकच्या फोटोंमध्ये असं काय आहे? 

Updated: Sep 17, 2021, 07:58 AM IST
 ऐश्वर्या-अभिषेकचे खोटे फोटो इंटरनेटवर व्हायरल; अभिनेत्याला द्यावं लागलं स्पष्टीकरण  title=

मुंबई : विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन - अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत नसले तरी इतर कारणांसाठी मात्र त्यांची चर्चा रंगलेली असते. सोशल मीडियावर देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण ऐश्वर्या आणि अभिषेक इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नसतात. पण इंटरनेटवर दोघांचे असे काही फोटो व्हायरल होत आहेत, त्या फोटोंवर अभिषेकला चक्क स्पष्टिकरण द्यावं लागलं आहे. 

एका सोशल मीडिया युझरने ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाचे काही फोटो मायक्रोब्लॉगिंग साईटवर शेअर केले. फोटोमध्ये ऐश्वर्याने अभिषेकचा हात धरला आहे तर अभिषेक कॅमेऱ्याकडे पाहाताना दिसत आहे. सध्या त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही त्यांच्या चाहत्यांकडून देखील त्यांच्या फोटोंना प्रेम मिळत आहे. 

पण व्हायरल होत असलेले फोटो खोटे असल्याचं अभिषेकने सांगितलं आहे. फोटोंवर अभिंषेक ट्विट करत म्हणाला, 'हे फोटोशॉप केलेले इमेजेस आहेत...' तर त्यांच्या काही चाहत्यांनी ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाचे खरे फोटो शेअर केले आहेत.