एकापेक्षा एक....बहिणीची अदा पाहून जान्हवी थक्क

 फॅशन शोमधून एकापेक्षा एक फोटो समोर येत आहेत.

Updated: Mar 26, 2022, 02:15 PM IST
एकापेक्षा एक....बहिणीची अदा पाहून जान्हवी थक्क title=

मुंबई : लॅकमे फॅशन वीकमध्ये आजकाल बऱ्याच सुंदरी आपल्या सौंदर्य आणि स्टाईलने रेड कार्पेटवर अवतरतात. अशा परिस्थितीत या फॅशन शोमधून एकापेक्षा एक फोटो समोर येत आहेत. दरम्यान, अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शनाया कपूर यांनीही फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात कपूर बहिणींमध्ये ग्लॅमरची जबरदस्त स्पर्धा होती.

शनाया मनीष मल्होत्रासाठी रॅम्प वॉक करते
यावर्षी लॅकमे फॅशन वीकमध्ये शनाया कपूरने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासाठी रॅम्प वॉक केला. मनीष मल्होत्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी रॅम्पवर चाललेल्या शनायाने तिच्या किलर लूक्सने शोला चार चांद लावले.

शनायाचा धाडसी लूक व्हायरल
समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये, तुम्ही पाहू शकता की, यावेळी शनाया कपूर निळ्या शेडच्या हॉल्टर नेक बॅक स्लिट गाऊनमध्ये शो स्पॉटर म्हणून दिसली. रॅम्प वॉकमधून शनायाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जान्हवी कपूर आणि शनायाचं नातं
जान्हवी कपूर आणि शनाया कपूर या चुलत बहिणी आहेत. जान्हवी कपूर बोनी कपूर यांची मुलगी आहे. तर शनाया कपूर बोनी कपूर यांचा धाकटा भाऊ संजय कपूरची मुलगी आहे. कपूर कुटुंबातील सगळ्या मुलींमध्ये खूप छान बॉन्डिंग आहे.