Fact Check : विक्की- कतरिनाच्या साखरपुड्याच्या सत्य समोर, कॅटच्या टीमने सांगितलं सत्य

विक्की- कौशल खरंच नात्यात अडकले का?

Updated: Aug 19, 2021, 07:10 AM IST
Fact Check : विक्की- कतरिनाच्या साखरपुड्याच्या सत्य समोर, कॅटच्या टीमने सांगितलं सत्य  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशल ( Vicky Kaushal) यांच्या साखरपुड्याची, रोका विधीची बुधवारी चांगलीच चर्चा रंगली. सोशल मीडियावर ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली. या दोघांनी आपल्या नात्याला नाव दिलं असं समजून चाहते देखील त्यांना शुभेच्छा देत आहेत. मात्र आता या बातमीचं सत्य समोर आलं आहे. अभिनेत्री कतरिना कैफच्या टिमने या बातमीमागचं सत्य काय? हे सांगितलं आहे. 

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांचा साखरपुडा किंवा रोका असं काहीही झालेलं नाही. त्यांनी कोणताच खासगी सोहळा केलेला नाही. त्यांच्या नात्याबद्दल कोणतीच ऑफिशिअल अनाऊन्समेंट झालेली नाही. 

कतरिनाच्या टीमने दिली माहिती 

कतरिना कैफ आणि विक्की कौशलने आपल्या साखरपुडा आणि रोको विधीवर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र अभिनेत्रीच्या टीमने एक माहिती दिली आहे. 'कोणतीच रोका सेरेमनी झाली नाही. कतरिना लवकरच टाइगर 3 च्या शुटिंगकरता निघणार आहे.'

अशी अफवा होती की, कतरिना कैफने बॉयफ्रेंड विक्कीसोबत वांद्रे येथील घरी अगदी साधेपद्धतीने साखरपुडा/ रोका केला आहे. तर माहितीनुसार, कतरिना सलमान खानसोबत इंटरनॅशनल एअरपोर्टवर दिसली. मात्र काही तांत्रिक कारणामुळे हे विमान रद्द झाले. त्यामुळे हे दोघं पुन्हा एकत्र प्रवास करणार आहेत. 

काय होती बातमी 

अनेक कार्यक्रमात विक्की कौशल आणि कैतरिना कैफ यांना एकत्र पाहण्यात आलं. या दोघांनी मात्र आपल्या नात्याबाबत कधीच खुलासा केला नव्हता. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचा साखरपुडा झाला आहे. यांच्यातील रोका ही विधी झाली आहे. फोटोग्राफर विरल भयानीने याबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. मात्र ती पोस्ट काढून टाकली.