Fact Check: नेटकरी म्हणतात ही तर, Nora Fatehi; तुम्हीपण हीच चूक करताय का?

काही चाहते असेही होते, ज्यांनी हा फोटो व्हायरल करत तो चक्क 'दिलबर गर्ल' नोरा फतेही हिचा असल्याचं सांगितलं. 

Updated: Feb 16, 2022, 03:29 PM IST
Fact Check: नेटकरी म्हणतात ही तर, Nora Fatehi; तुम्हीपण हीच चूक करताय का?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : आपल्या आवडीच्या सेलिब्रिटीचं बालपण पाहण्याची संधी कोणतेही चाहते दवडताना दिसत नाहीत. चांगल्या आठवणी कधीही आणि कोणाच्याही चेहऱ्यावर आनंदच आणतात. अशीच एक आठवण एका अभिनेत्रीनं शेअर केली होती. 

बालपणीची आठवण शेअर करताना तिच्या कैक चाहत्यांना आणि फॉलोअर्सना कमालीचा आनंद झाला. पण काही चाहते असेही होते, ज्यांनी हा फोटो व्हायरल करत तो चक्क 'दिलबर गर्ल' नोरा फतेही हिचा असल्याचं सांगितलं. 

एक कमेंट आणि बस्स... चर्चेला सुरुवात. ही नोरा नाही, यावर कोणाचंही लक्ष गेलं नाही. फक्त सोशल मीडिया युजर्सच नाही, तर काही माध्यमांनीही अती घाई करत ती नोरा असल्याचं म्हटलं. 

मुद्दा असा, की हा फोटो शेअर करणारी आणि स्वत: बालपणीचं आपलं रुप सर्वांसमोर आणणारी ही अभिनेत्री होती, भूमी पेडणेकर. आजही तिचा हा फोटो इन्स्टाग्रामवर दिसतो.

bhumi nora confusion

भूमीच्या बालपणीच्याच फोटोनं अनेकांचा गोंधळ उडवला आणि तिच्या एका पोस्टच्या निमित्तानं नोरा फतेहीसुद्धा नकळतच चर्चेत आली. 

तुम्हीही या अभिनेत्रीला तिचा बालपणीचाच फोटो पाहून ओळखलं, की नोरा म्हणत इतरांप्रमाणेच चुकीची पुनरावृत्ती केली?