मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री एवलिन शर्मा (Evelyn Sharma) हिने 15 मे रोजी गुपचूप विवाह बंधनात अडकली. डेंटल सर्जन तुषार भिंडी यांच्यासोबत लग्न केलेल्या एवलिनने चाहत्यांना आणखी एक धक्का दिला आहे. एवलिन लवकरच आई होणार आहे. (Evelyn Sharma Is Expecting Her First Child With Hubby, Tushaan Bhindi, Shares A Baby Bump Picture) आपल्या आयुष्यातील या खासगी क्षणांना ती एन्जॉय करण्यास उत्सुक आहे.
एवलिनने बॉलिवूड टाइम्सशी बोलताना आपल्या गरोदरपणाची गोड बातमी शेअर केली. ती म्हणाली की,'मला तर अगदी चंद्रावर असल्यासारखं वाटतं. यापेक्षा चांगलं बर्थ डे गिफ्ट मला काहीच असू शकत नाही. आशा करते की, बाळाला घेऊन मी लवकरच भेटेन.'
एविलनने सांगितलं की, कोविडच्या अगोदरची लाइफ मी खूप मिस करत आहे. मी त्या दिवसांनी मिस करतेय जेव्हा मी रेड कार्पेटवर वॉक करत होती. तसेच प्रवास देखील मिस करत होती. मी भारतातील अनेक डोंगर भागात चांगले दिवस घालवले आहेत.
एवलिन आणि तुषार 2018 मध्ये एकमेकांना भेटले. त्यांच्या मित्र परिवाराने एका ब्लाइंड डेट अरेंज केली होती. तेव्हा हे दोघं भेटले. यानंतर दोघांनी ऑक्टोबर 2019 मध्ये साखरपुडा केला. तुषारने एवलिनला सिडनीच्या हार्बर ब्रिजवर प्रपोझ केलं होतं. त्यानंतर या दोघांनी 15 मे 2021 रोजी लग्न केलं. त्यानंतर दोघं ऑस्ट्रेलियाच्या लक्झरी हॉटेलमध्ये गेले. हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते.