प्राजक्ता माळी अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'तो'?

मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज नुकतीच प्लॅनेट मराठीवर रिलीज झाली आहे. 

Updated: May 25, 2022, 03:55 PM IST
 प्राजक्ता माळी अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'तो'? title=

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज नुकतीच प्लॅनेट मराठीवर रिलीज झाली आहे. या वेबसिरीजमुळे मराठी सिनेसृष्टीत नक्कीच हादरा बसला असेल हे नक्की.

दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांनाच्या भेटीला आले आहेत. पानसे यांची 'रानबाजार' ही वेबसिरीज नुकतीच रिलीज झाली आहे. ही वेबसिरीज पाहून मराठी सिनेसृष्टीतला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड सिरीज असल्याचं स्पष्ट होत आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळत आहे. प्रेक्षकामध्ये ही वेबसिरीज प्रचंड पसंतीस उतरत आहे. सध्या सगळीकडेच या वेबसिरीजची जोरदार चर्चा सुरुये. 

'रानबाजार' या वेबसिरीजच्या निमीत्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळीने झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत एका पेक्षा एक खुलासे केले आहेत. अभिनेत्री माळीने तिच्या लग्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी ती बोलताना म्हणाली, मी अद्याप तरी  लग्नाचा काही विचार केलेला नाही. आणि किमान दोन वर्ष तरी मी लग्न करणार नाही.  सध्या मी सिंगल आहे. त्यामुळे प्राजक्ताच्या या विधानानंतर हे स्पष्ट होतं की, प्राजक्ता माळी सध्या लग्न करण्याच्या मुडमध्ये नाहीये. 

रानाबाजार या वेबसिरीजमधील प्राजक्ताच्या अभिनयाचं सर्वस्तरावरुन कौतूक होत आहे. या सिरिजचे पुढचे भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.