मुंबई : सोशल मीडियावर आताचे कलाकार देखील भरपूर अॅक्टिव्ह असतात. पण असाच अॅक्टिव्हनेस जेव्हा त्यांना भोवतो तेव्हा हेच कलाकार सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. गेल्या कित्येक दिवसांपासून असेच कलाकार ट्रोल होत आहेत. आता ईशा गुप्ता ही सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. आणि त्याला कारण आहे कलिंगड खाणाऱ्या ईशा गुप्ताने डाळिंब लिहून इंस्टाग्रामवर केलं शेअर.
तिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे स्वत:च स्वत:चे हसू केले आहे. ईशा गुप्ताने इन्स्टाग्रामवर टरबूज खातानाचा एक फोटो शेअर केला. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने पोमेग्रेनेट म्हणजेच डाळिंब असे लिहिले. अशात चाहत्यांनी ईशाला टार्गेट करताना तिची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. टरबूज खातानाच्या फोटोला डाळिंब म्हणून ईशाने स्वत:च स्वत:ची फसगत केली आहे. त्यामुळे ईशा गुप्ता सोशल मीडियावर झाली ट्रोल.
एका युजरने ईशाला टॅग करताना लिहिले की, ‘तू प्रीक्लास नक्कीच बंक करून पळून जात असशील.’ ईशाचे चाहते तिला सांगत आहेत की तर डाळिंब नसून टरबूूज आहे. आणखी एका युजरने ईशाच्या फोटोला Watermelon became hotmelon..।अशी कॉमेण्ट दिली. खरं तर पहिल्यांदाच ईशाला अशा पद्धतीने ट्रोल केले जात आहे असे नाही. कारण यापूर्वीही तिला बऱ्याचदा ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. ईशा नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते.
फिल्मफेअर मॅगझीनचे एडिटर जितेश पिल्लईने एक ट्विट करून पझल पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी विचारलं होतं की या फोटोत किती त्रिकोण आहेत. ज्याच उत्तर देताना अभिनेत्री सोनम कपूर फसली आहे. आणि चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. तिने त्यावेळी दिलेले उत्तर योग्य वाटत होतं पण चाहत्यांनी तिला खरं उत्तर देऊन सोनमला तू चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. मात्र त्यानंतर सोनमला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे