छातीत दुखू लागल्याने ज्येष्ठ अभिनेता रुग्णालयात दाखल, जाणून घ्या हेल्थ अपडेट

बॉलिवूडमध्ये आपल्या कसदार अभिनयाने वेगळी निर्माण करणारे अभिनेते अन्नु मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे

Updated: Jan 26, 2023, 09:43 PM IST
छातीत दुखू लागल्याने ज्येष्ठ अभिनेता रुग्णालयात दाखल, जाणून घ्या हेल्थ अपडेट title=

Entertainment : बॉलीवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखू लागल्याने (Chest Congestion) अन्नू कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. आज सकाळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं तसंच त्यांचा रक्तदाब वाढला त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात (Sir Gangaram Hospital) त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कॉर्डिओलॉजीस्ट (Cardiologist) डॉ. सुशांत यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

कोण आहेत अन्नू कपूर
अन्नू कपूर यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1956 ला मध्यप्रदेशमधल्या भोपाळ इथं झाला. अन्नू कपूर यांचे वडिल मदनलाल पंजाबी तर आई कमला या बंगाली होत्या. मदनलाल हे एका पारसी थिएटर कंपनीत (Theater Company) काम करत होते. ही थिएटर कंपनी विविध शहरात जाऊन कार्यक्रम सादर करायची. अन्नू कपूर यांच्या आई एक कवियत्री होत्या. त्यांचबरोबर त्यांना क्लासिकल डान्सची आवड होती. अन्नू कपूर यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. पैशांअभावी अन्नू कपूर यांना शिक्षणही अर्धवट सोडावं लागलं.

त्यानंतर लहानपणापासूनच अन्नू कपूर वडिल मदनलाल यांच्याबरोबर थिएटर कंपनीत जायला लागले. इथेच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. मेहनत करण्याची तयारी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. वयाच्या 22 वर्षी त्यांच्या आयुष्यात मोठी संधी चालून आली. एका नाटकात ते 70 वर्षांच्या वयोवृद्धाची भूमिका साकारत होते. हे नाटक पाहण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल आले होते. त्यांनी अन्नू कपूर यांचा अभिनय पाहिला आणि त्यांना तो प्रचंड आवडला. त्यांनी चक्क अन्नू कपूर यांना पत्र पाठवून त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं. त्याचबरोबर त्यांना भेटायलाही बोलावलं.

1979 मध्ये कारकिर्दीला सुरुवात
अन्नू कपूर यांनी 1979 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मंदी या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर मग अन्नू कपूर यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी अनेक चित्रपटात अभिनय साकारला. विनोटी अभिनेते म्हणून काम करताना त्यांना विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ओळखलं जायचं. याशिवाय त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. 

अन्नू कपूर यांना विक्की डोनर या चित्रपटातील अभिनयासाठी फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सध्या अन्नू कपूर 92.7 रेडिओ एफएमवर प्रासरित होणाऱ्या 'सुहाना सफर विद अन्नू कपूर' या कार्यक्रमातून प्रेक्षकांशी संवाद साधतायत. यात ते चित्रपटसृष्टीशी जोडले गेलेले अनेक किस्से चाहत्यांशी ऐकवतात.