रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'ने रचला इतिहास, पठाण, गदर चित्रटाचाही विक्रम मोडला

Entertainment : बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कुमारच्या ॲनिमल चित्रपटाने इतिहास रचला आहे. 1 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. प्रदर्शनाच्या तिसऱ्याच आवड्यातही ॲनिमलने दमदार कमाई सुरु ठेवली आहे. 

राजीव कासले | Updated: Dec 18, 2023, 11:21 AM IST
रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'ने रचला इतिहास, पठाण, गदर चित्रटाचाही विक्रम मोडला title=

Entertainment : एक डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या 'ॲनिमल' चित्रपटाने रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) बॉलिवूडचा सुपरस्टार बनवलं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून विक्रमी कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत रणबीर कपूरचाही समावेश झाला आहे. रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या (Boby Deol) अभिनयाने 'ॲनिमल' (Animal) चित्रपटाने बॉक्सऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली असून आता तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटानो कोटीची उड्डाण घेतली आहेत. पहिल्या दोन आठवड्यात या चित्रपटाने दमदार कमाई केली. आता शेवटच्या रविवारी आलेल्या आकडेवारीनुसार तिसऱ्या आठवड्यातही 'ॲनिमल'ने कमाई सुरुच ठेवली आहे. 

रविवारी 'ॲनिमल'ची कमाई
प्रदर्शनाच्या 17 व्या दिवशी देखील रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'ने चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी खेचून आणली आहे. शनिवारी या चित्रपटाने 12.8 कोटीची कमाई केली. रविवारी सुद्ध चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तिसऱ्या रविवारी या चित्रपटाने 15-16 कोटी रुपयांची कमाई केली. त्याआधी शुक्रवारी 8.3 कोटी रुपयांची कमाई केली होती. तिसऱ्या आठवड्यात 'ॲनिमल'ने 36-37 ची कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटातं कलेक्शन 93.6 कोटी रुपये इतकं होतं. 

पठाण, गदर चित्रटाचा विक्रम मोडला
'ॲनिमल'ने शनिवारपर्यंत भारतात 497 कोटी रुपयांची कमाई केली होती. रविवारीचं कलेक्शन धरून या चित्रपटाने 512 कोटी रुपयांचा टप्पा पार केला. 500 कोटी रुपयांचा टप्पा गाठणार रणबीर कपूरच्या कारकिर्दीतील हा पहिला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या कमाईचा वेगही जबरदस्त आहे. सर्वात वेगवान 500 कोटींचा टप्पा गाठणारा 'ॲनिमल' बॉलिवूडमधला दुसरा चित्रपट ठरला आहे. अवघ्या 17 दिवसात 'ॲनिमल'ने 500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या पठाणने 22 दिवसात पाचशे कोटी रुपयांची कमाई केली होती. तर सनी देओलच्या गदरला ही कामगिरी करण्यासाठी 24 दिवसांचा कालावधी लागला होता. 

सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत शाहरुख खानचा जवान हा चित्रपट पहिल्या स्थानावर आहे. जवानने 13 दिवसात 500 कोटी रुपयांची कमाई केली होती. 

रणबीर कपूर अनेक काळापासून बॉलिवूडच्या सुपरस्टार पदासाठी दावेदार होता. आता 'ॲनिमल'ने त्याच्या सुपरस्टार पदावर शिक्कमोर्तब केलं आहे. 'ॲनिमल'ने केवळ कमाईच केली नाहीए तर शाहरुख, सलमान सारख्या दिग्गज अभिनेत्यांनाही टक्कर दिली आहे. 

तृप्ती डिमरी नॅशनल क्रश
'ॲनिमल' चित्रपटात रणबीर कपूर आणि बॉबी देओलबरोबरच अभिनेत्री तृप्ती डिमराही जबरदस्त लोकप्रिय झाली होती. या चित्रपटात तृप्तीचा इंटीमेट सीन जितका चर्चेत होता तितकी प्रमुख अभिनेत्री रश्मिकाच्या भूमिकेची चर्चा झालीच नाही. तृप्तीने या चित्रपटात 'भाभी 2' उर्फ झोयाची भूमिका साकारली आहे.