'कोई मिल गया'चा बिट्टू आठवतोय? 20 वर्षांनंतर दिसतो इतका हँडसम... फिटनेसमध्ये ऋतिकलाही देतो टक्कर

Entertainment : अभिनेता ऋतिक रोशनचा 'कोई मिल गया' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला होता. या ऋतिक रोशनबरोबर काही लहान मुलं दाखवण्यात आली होती. यातला एक बालकलाकार होता बिट्टू. चित्रपटाला आता वीस वर्ष उलटून गेली आहेत. 

राजीव कासले | Updated: Oct 26, 2024, 06:20 PM IST
'कोई मिल गया'चा बिट्टू आठवतोय? 20 वर्षांनंतर दिसतो इतका हँडसम... फिटनेसमध्ये ऋतिकलाही देतो टक्कर title=

Entertainment : 'कोई मिल गया' अभिनेता ऋतिक रोशनचा 'कोई मिल गया' (koi mil gaya) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला होता. या चित्रपटाचा विक्रम आजही अबाधित आहे. या काळात लहान मुलांचा हा फेव्हरेट चित्रपट होता. इतकंच काय तर सध्याच्या काळातील लहान मुलांनाही या चित्रपटाची भूरळ पडते. या चित्रपटात अभिनेता ऋतिक रोशनची (hrithik roshan) बुद्धी एका लहान मुलाप्रमाणे दाखवण्यात आली आहे. पण एलिअन आल्यानंतर तो प्रगल्भ होतो असं दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात ऋतिक रोशनबरोबर अभनेत्री प्रीति झिंटानेही (preity zinta) महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 

एलियनशी संबंधित असलेल्या चित्रपटांमध्ये हा 'कोई मिल गया' हा चित्रपट आजही मुलांच्या आवडीचा आहे. या चित्रपटात ऋतिक रोशनबरोबर लहान मुलांची एक फौज दाखणवण्यात आली आहे. ही मुलं ऋतिकचे पक्के मित्र असतात. पावला-पावलावर ही मुलं ऋतिकची मदत करताना दाखवण्यात आली आहेत. या मुलांमध्येच एक बालकलाकार आहे बिट्टू. आपल्या खोडकर भूमिकेने बिट्टने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. चित्रपटाला आता वीस वर्ष उलटली असून बिट्टूही आता मोठा झाला आहे. 

20 वर्षांनंतर दिसतो इतका हँडसम
वीस वर्षांनंतर आता बिट्टू हँडसम बनला आहे. बिट्टूचं खरं नाव अनुज पंडित शर्मा (Anuj Sharmma) आहे. 'कोई मिल गया' चित्रपटात बिट्टू बराचवेळा आयला बोलताना दाखवला आहे. लहानपणी बिट्टू मासूम आणि क्यूट होता. तर आता स्टायलिश आणि हँडसम झालाय. अनूज फिटनेसच्याबाबतही ऋतिकला टक्कर देतो. अनुज आपला बराचसा वेळ जिममध्ये घालवतो. आपल्या फिटनेसची तो चांगलीच काळजी घेतो. 'कोई मिल गया' चित्रपटावेळी अनुज 13 वर्षांचा होता आता तो 33 वर्षांचा झालाय. 

<

या चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम
अनुज शर्मा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. आपल्या आयुष्यातील घडामोडी, फोटो आणि व्हिडिओज तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. सोशल मीडियावर अनुजचे तब्बल 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. 'कोई मिल गया' नंतर अनुजने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलंय. बाल कलाकार म्हणून तो जास्त लोकप्रिय झाला होता. टीव्ही कार्यक्रमातही त्याने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. पर 'परवरिश', 'आदत से मजबूर', 'बमिनी आणि बॉईज' या कार्यक्रमात त्याने काम केलं आहे. याशिवाय 'टोटल स्यापा', 'से सलाम इंडिया' या सारख्या चित्रपटातही काम केलं आहे.