मुंबई का किंग कौन? भिकू म्हात्रे परत येतोय, मनोज वाजपेयीची पोस्ट व्हायरल

तब्बल 24 वर्षानंतर भिकू म्हात्रे परत येतोय, मनोज वाजयेपीने Video शेअर करत चाहत्यांना दिली खुशखबर... नव्या भिकू म्हात्रेचा लूक पाहिलात का?

Updated: Nov 25, 2022, 08:45 PM IST
मुंबई का किंग कौन? भिकू म्हात्रे परत येतोय, मनोज वाजपेयीची पोस्ट व्हायरल title=

Entertainment News : बॉलिवूडमधल्या (Bollywood) दिग्गज अभिनेत्यांमध्ये मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) या अभिनेत्याचं नाव घेतलं जातं. आपल्या कसदार अभिनयाने मनोज वाजपेयीने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये आपली छाप उमटवली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेल्या The Family Man या मालिकेतील मनोज वाजपेयीच्या अभिनयाची चांगलीच चर्चा झाली. याशिवाय अनेक चित्रपटांमध्ये त्याने विविध आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. पण आजही मनोज वाजपेयीला ओळखलं जातं ते भीकू म्हात्रे (Bhiku Mhatre) या नावानेच. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'सत्या' (Satya) या चित्रपटातील भिकू म्हात्रे आजही लोकांच्या आठवणीत आहे.

भीकू म्हात्रे परत येतोय
1998 साली प्रदर्शित झालेल्या सत्या या चित्रपटाने मनोज वाजपेयीला नवी ओळख मिळाली. रामगोपाल वर्मा दिग्ददर्शित 'सत्या' या चित्रपटात मनोज वाजपेयीने साकारलेली भिकू म्हात्रेची भूमिका लोकांच्या चांगलीच पसंतीत उतरली होती. आज 24 वर्षांनंतरही भिकू म्हात्रेला चाहते विसरलेले नाहीत. आता हाच भिकू म्हात्रे पुन्हा येतोय. 

मनोज वाजपेयीची पोस्ट व्हायरल
याबाबत मनोज वायपेयीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ती चांगली व्हायरल होत आहे. सत्या चित्रपटातील बॅकग्राऊंड म्युझिकवर मनोज वाजपेयीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मनोज वाजपेयी ब्लॅक सूटमध्ये दिसत असून त्याच्या मनगटावर सोन्याचं घडाळ तर हातात गोल्डन बंदूक दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातील THE RETURN OF BHIKU MHATRE असं लिहिण्यात आलं आहे. 

हिट्स म्यूझिकने विचारलेला प्रश्न
या व्हिडिओचा संबंध हिट्स म्यूझिक असून मनोज वाजपेयीने त्यांना टॅगही केलं आहे. विशेष गोष्ट म्हणजे गुरुवारी हिट्स म्यूझीकतर्फे ट्विटरवर 'मुंबई का किंग कौन?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मनोज वाजपेयीने #BhikuMhatre असं लिहिलं होतं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 'सत्या 2' येणार का याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. 

चाहते खूश, लाईक आणि कमेंटचा पाऊस
मनोज वाजपेयीने व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याचे चाहते खुश झाले आहेत. युजर्स आणि सेलिब्रेटिंच्याही या व्हिडिओवर कमेंट येत आहेत. एका युजरने लिहिलंय, 'अब मजा आयेगा ना भिडू'. एका युजरने सत्यामधील फेमस डायलॉग टॅग केला आहे, 'अपन भाईलोग है... भाईलोग कि तरह रहना मंगता अपुन को...'

सत्याने दिली नवी ओळख
सत्या चित्रपटापूर्वी मनोज वाजपेयीने काही चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. पण सत्या चित्रपटातील भिकू म्हात्रेमुळे मनोज वाजपेयी एका रात्रात स्टार बनला. हा चित्रपटा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.