फोटोत दिसणाऱ्या 'या' तीन बहिणींना ओळखलंत, आज बॉलिवूडवर करतायत राज्य

Entertainment : मुलगी नको ही मानसिकता एकविसाव्या शतकातही बदलेली नाही. एकापाठोपाठ चार मुली झाल्याने आई-वडिल दु:खी झाले. पण त्याच मुली आज त्यांच्यासाठी अभिमान ठरल्या आहेत. या चारही मुलींचा आज देशभरात डंका आहे.     

Updated: Dec 6, 2023, 10:01 PM IST
फोटोत दिसणाऱ्या 'या' तीन बहिणींना ओळखलंत, आज बॉलिवूडवर करतायत राज्य title=

Entertainment : सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या (Bollywood) अनेक कलाकारांचे लहानपणीचे फोटो व्हायरल होत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच तीन बहिणींबद्दल सांगणार आहोत,  ज्यांनी बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. लहान पडद्यावरच नाही तर मोठ्या पडद्यावरही या बहिणींनी छाप उमटवली आहे. यातली एक गायक, एक नृत्यांगणा तर एक कोरियोग्राफर आहे. यातली मोठी बहिणीने तब्बल 6 भाषांमध्ये गाणं गायलं आहे. बॉलिवूडमध्ये तीने अनेक हिट गाणी दिली आहेत. 

तीन बहिणींचा लहानपणीचा फोटो व्हायरल
सोशल मीडियावर या बहिणींचा लहानपणीचा फोटो व्हायरल होत आहे. फोटोत दिसणाऱ्या या मुली एका बाहुलीबरोबर खेळताना दिसत आहे. खरं तर एकापाठोपाठ चार मुली झाल्याने आई-वडिल दु:खी झाले. आपल्या एक मुलगा असावा यांची त्यांना खंत वाटत होती. पण ज्या मुलींमुळे पालक निराश होते, त्याच मुली आज त्यांच्यासाठी अभिमान ठरल्या आहेत. या चारही मुलींचा आज देशभरात डंका आहे. 

कोण आहेत त्या चार बहिणी?
फोटोत ज्या तीन बहिणी दिसत आहेत आज देशभरात मोहन सिस्टर्स (Mohan Sisters) नावाने ओळखलं जातं. आपापलं वेगळ क्षेत्र निवडत मोहन बहिणींनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. या बहिणींची नावं आहेत नीती मोहन (Niti Mohan), शक्ती मोहन (Shakti Mohan) आणि मुक्ती मोहन (Mukti Mohan) आज देशासह जगभरात मोहन सिस्टर्सने आपली वेगळी ओळक निर्माण केली असून त्यांचं फॅन फॉलोईंग मोठं आहे. फोटोत मध्ये बसलेली मोठी मुलगी नीती मोहन आहे, तर उजव्या बाजूला निळ्या फ्रॉकमध्ये बसलेली शक्ती मोहन आहे. तर डाव्या बाजूला बसलेली मुक्ती मोहन आहे. 

नीती मोहनच्या आवाजाची जादू
नीती मोहन लोकप्रिय गायिका आहे. नीतीने केवळ हिंदीच नाही तर मराठी तामिळ, तेलुगु, कन्नड, आणि पंजाबी भाषेतही गाणं गायलं आहे. हिंदीतील तिची अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. यात नजर लाए ना, तू खींच मेरी फोटो अशा गाण्यांचा समावेश आहे. इश्क वाला लव्ह या गाण्यने नीती मोहनला प्रसिद्धीच्या शिखरावर बसवलं. गाण्यांच्या अनेक कार्यक्रमात नीती आज जज म्हणूनही काम करते.  नीती मोहनने 15 फेब्रुवारी 2019 रोजी अभिनेता निहार पांड्याबरोबर लग्ना केलं. तिला एक मुलगी आहे. 

डान्सर शक्ती मोहन
मोहन बहिणींमधल्या दुसऱ्या बहिणीचं नाव आहे शक्ती मोहन. शक्ती ही एक प्रसिद्ध डान्सर आहे. डान्सच्या क्षेत्रात आज तीचं नाव प्राधान्याने घेतलं जातं असून प्रसिद्ध कोरिओग्राफर (choreographer) म्हणूनही तिला ओळखलं जातं. डान्सच्या काही रिअॅलिटी शोमध्ये शक्ती मोहन जज म्हणून करते.

अभिनेत्री आणि डान्सर
तिसऱ्या क्रमांकाची बहिण मुक्ती मोहन ही अभिनेत्री  आणि डान्सर आहे. मुक्तीने काही हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. 2007 मध्ये विशाल भारद्वाज यांच्या 'ब्लड ब्रदर्स' या शॉर्ट फिल्ममधून मुक्तीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर छोट्या पडद्यावरही तीने काही मालिकांमध्ये काम केलं. डान्स कोरिओग्राफर म्हणूनही मुक्तीने आपली ओळख निर्माण केली आहे.