विक्की कौशलबरोबर लग्न केल्यानंतर कतरीना कैफ सोशल मीडियातून गायब? खरं कारण आलं समोर

Katrina Kaif Instagram: गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal)विवाहबंधनात अडकले. पण लग्नानंतर कतरीना सोशल मीडियापासून बॉलिवूडपर्यंत सगळीकडूनच गायब झाली आहे.

राजीव कासले | Updated: May 3, 2023, 05:06 PM IST
विक्की कौशलबरोबर लग्न केल्यानंतर कतरीना कैफ सोशल मीडियातून गायब? खरं कारण आलं समोर title=

Katrina Kaif and Vicky Kaushal Marriage: अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) आपल्या सौंदर्यासाठी आणि दमदार अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये (Bollywood) ओळखली जाते. पण गेल्या काही महिन्यात कतरीना गायबच झाली आहे. सोशल मीडियापासून अगदी पार्टीज आणि कोणत्या कार्यक्रमांमध्येही ती दिसत नाही. विक्की कौशलबरोबर (Vicky Kaushal) लग्न झाल्यानंतर 'ती सध्या काय करते' असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अशाच सोशल मीडियावर कतरीना कैफच्या प्रेग्नेंसची शक्यता वर्तवली जात आहे. पण या सर्व चर्चा निव्वळ अफवा असून तिच्या गायब होण्यामागे वेगळंच कारण असल्याचं समोर आलं आहे. 

कतरीना का गायब आहे?
बॉलीवूड लाईफने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार कतरीनाबद्दल चाहत्यांची उत्सुकता कायम राहावी असं 'टायगर 3' च्या मेकर्सचं मत आहे. यंदाच्या वर्षात कतरीनाचा बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात बॉलिवूडमधले दिग्गज सलमान खानबरोबरच शाहरुख खानही अॅक्शन भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्टनुसार 'टायगर 3' चित्रपटात कतरीना अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे (Katrina Kaif Upcoming Film). त्यामुळे कतरीना सध्या काय करते याची उत्सुकता चाहत्यांममध्ये कायम राहावी यासाठी ती सार्वजनीक ठिकाणी दिसत नाहीए.

कतरीना-विक्कीचं बेबी प्लानिंग
दरम्यान, कतरीना कैफ सोशल मीडिया किंवा सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नसल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. कतरीना लवकरच गुड न्यूज देणार असल्याचं बोललं जात होतं. पण या सर्व अफवा असल्याचं समोर आलं आहे. कतरीना सध्या आपल्या कामावर फोकस करतेय.

कतरीना विक्कीपेक्षा पाच वर्षांनी मोठी
9 डिसेंबर 2022 मध्ये कतरीना कैफ आण विक्की कौशलचा विवाह पार पडला. कतरीना आणि विक्की ही बॉलिवूडमधल्या फेव्हरेट कपलपैकी एक आहे. कतरीना आणि विक्कीच्या वयात मोठं अंतर आहे. कतरीना विक्की कौशलपेक्षा पाच वर्षांनी मोटी आहे. विक्की आता 33 वर्षांचा आहे तर कतरीनाचं वय 38 आहे. पण ही पहिलीच जोडी नाही. प्रियंका चोपडा-निक जोनस, अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय या जोड्यांमध्येही वयाचं मोठं अंतर आहे. 

कतरीना-विक्कीच्या फोटोंचाही विक्रम
कतरीना आणि विक्कीचा राजस्थानमधल्या सवाई माधोपूर सिक्स सेन्सेस फोर्टमध्य विवाहसोहळा संपन्न झाला. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा शाही विवाह सोहळा पार पडला होता. त्यानतंर विक्की कौशलने लग्नाचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. या फोटोंना अवघ्या 20 मिनिटात 10 लाख लाइक्स मिळाले होते.