Adipurush Controversy : आदिपुरुष चित्रपट 16 जून रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला. पण जेव्हा पासून हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, तेव्हा पासून या चित्रपटातील संवादावरुन वाद निर्माण झाला आहे. आदिपुरुष (Adipurush) चित्रपटातील संवादावरुन देशभरात अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन केलं जात आहे. मनोज मुंतशिर (Manoj Muntashir) यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत मनोज मुंतशिर यांनी मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) सुरक्षेची मागणी केली आहे. मनोज मुंतशिर यांच्या अर्जावर मुंबई पोलिस निर्णय घेणार आहेत.
प्रभास, कृति सेनन आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला आदिपुरुष शुक्रवारी म्हणजे 16 जून रोजी देशभरात प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दमदार कमाई करतोय, पण या चित्रपटातील संवादावरुन नवा वाद निर्माण झाला. काही ठिकाणी याविरोधात प्रदर्शन केली जात आहेत तर अनेकांनी चित्रपाटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. रामायणावर आधारित असलेला या चित्रपटाचे ओम राऊत हे दिग्दर्शक आहेत.
या संवादावरुन वाद
1 - हनुमान जेव्हा लंकेत जातो तेव्हा एक राक्षस त्याला बघतो आणि त्याला विचारतो 'ये लंका क्या तेरी बुआ का बगीचा है, जो हवा खाने चला आया.''
2- सीतामातेला भेटल्यानंतर हनुमानालमा लंकेत राक्षस पकडतात. त्यानंतर मेघनाथ हनुमानाच्या शेपटीला आग लागतो. यावर हनुमान म्हणतो... ''तेल तेरे बाप का. कपड़ा तेरे बाप का. और जलेगी भी तेरे बाप की."
3- हनुमान लंका जाळतो आणि तिथून परतल्यानंतर तो श्रीरामांना भेटतो. श्रीराम हनुमानाला विचारतो काय झालं, यावर हनुमान उत्तर देतो... 'जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे, उनकी लंका लगा देंगे'
4- लक्ष्मणावर वार करताना इन्द्रजीत बोलतो... ''मेरे एक सपोले ने तुम्हारे इस शेष नाग को लंबा कर दिया. अभी तो पूरा पिटारा भरा पड़ा है.''
याशिवाय भगवान श्रीराम, सीता, हनुमान आणि रावण यांच्या वेशभूषेवरही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आदिपुरुषच्या दिग्दर्शकांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. अनेक साधुसंतांनीही या चित्रपटाच्या विरोधात पुढे आले आहेत. इतकंच नाही तर चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी केली जात आहे. भाजपसहीत अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही चित्रपटाला विरोध केला आहे. कोणाच्याही भावना दुखावल्या जातील अशा कोणत्याही गोष्टीला परवानगी नाही असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही म्हटलंय.
संवाद बदलण्यास तयार
आदिपुरुष चित्रपटातील संवादावरुन वाद सुरु झाल्यानंतर चित्रपटाच्या मेकर्सने संवाद बदलण्याची तयारी दाखवली आहे. चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशिर यांनी भगवान श्रीरामांची महाकथा मुलांपर्यंत पोहोचवणे हा चित्रपटाचा उद्देश असल्याचं म्हटलं आहे. मुलांना आपल्या खऱ्या महानायकाला जाणून घ्यायचंय. आपण सध्या एका अशा युगात आहोत, जिथे मुलांच्या मनावर हॉलीवूडमधील पात्र राज्य करतातय. मुलांना हल्क आणि सुपरमॅन माहित आहेत, पण हनुमा आणि अंगद माहित नाहीत. त्यामुळे रामायणातील ही पात्र आजच्या मुलांपर्यंत पोहोचली पाहिजेत, तरुण वर्गानेही हा चित्रपट पाहावा असं स्पष्टीकरण मनोज मुंतशिर यांनी दिलं आहे.
चित्रपटात 4000 संवाद आहेत, केवळ 5 संवाद लोकांना आवडलेल नाही. याचा अर्थ 3995 संवाद लोकांना आवडलेल आहे. ज्यांना या पाच संवादावर आपत्ती आहे ते बदलण्यास तयार असल्याचं मुंतशिर यांनी सांगितलं.