सोनाक्षीच्या लग्नात गैरहजर? अखेर भाऊ लव सिन्हाने सोडलं मौन, 'म्हणाला मला...'

Luv Sinha On Sonakshi Sinha Wedding: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा विवाहसोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्यात अनेक जण सहभागी झाले होते. पण सोनाक्षीचे भाऊ लव आणि कुश मात्र कुठेच दिसले नव्हते. यावरुन आता लव सिन्हाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राजीव कासले | Updated: Jun 24, 2024, 07:52 PM IST
सोनाक्षीच्या लग्नात गैरहजर? अखेर भाऊ लव सिन्हाने सोडलं मौन, 'म्हणाला मला...' title=

Sonakshi Sinha Wedding : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)  आणि अभिनेता जहीर इक्बालचा (Zaheer Iqbal) विवाह सोहळा मुंबईत एका शानदार कार्यक्रमात पार पडला. 23 जूनला सोनाक्षी-जहीर लग्नबंधनात अडकले. या सोहळ्यासाठी सोनाक्षीच्या कुटुंबातून तिचे आई-वडील उपस्थित होते. तर जहीरचं संपूर्ण कुटुंब सहभागी झालं होतं. पण या कार्यक्रमात उणीव जावणवली ती सोनाक्षीचे दोन भाऊ लव आणि कुशची. सोनाक्षीचे भाऊ लव-कुश या विवाह सोहळ्यात सहभागी झाले नव्हते. लव आणि कुश यांचा या लग्नाला विरोध होता असं बोललं जातंय. 

साकिब सलीमने निभावली भावाची भूमिका
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात (Sonakshi Sinha Wedding) तिला आशिर्वाद देण्यासाठी वडील शत्रुघ्न सिन्हा आणि आई पूनम सिन्हा उपस्थित होते. पण लव आणि कुश सिन्हा हजर नव्हते. त्यामुळे सोनाक्षीची बेस्ट फ्रेंड हुमा कुरैशीचा भाऊ साकिब सलीमने भावाची भूमिका निभावली. सोनाक्षी-जहीरच्या लग्नाचा एक व्हिडिओ समोल आला असून यात साकिब लग्नातील प्रथा पार पाडताना दिसत आहे. याशिवाय सोनाक्षीचे मित्रही यात सहभागी झाले होते.

लव सिन्हाची पहिली प्रतिक्रिया
सोनाक्षी-जहीरच्या लग्नात लव आणि कुश सहभागी न झाल्याने सोशल मीडियावर वेगवेगळी चर्चा रंगली आहे. यादरम्यान लव सिन्हाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हिंदुस्तान टाईम्सची बोलताना लव सिन्हाने सोनाक्षीच्या लग्नावरच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. मला थोडासा वेळ द्या एक-दोन दिवसात याचं उत्तर तुम्हाला मिळेल, सध्या मी यावर काही बोलू इच्छित नाही, असं लव सिन्हाने उत्तर दिलंय. 

याआधीही बाळगलं होतं मौन
सोनाक्षी आणि जहीर इक्बालचं लग्न ठरल्यापासून लव आणि कुशने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधीही लव सिन्हाला सोनाक्षीच्या लग्नावरुन प्रश्न विचारण्यात आला होता. पण त्यावेळी देखील लवने मौन बाळगलं होतं. 

सात वर्षांचं नातं
सोनाक्षी आणि जहीरने सात वर्ष एकमेकंना डेट केल्यानंतर 23 जूनला मुंबईतल्या बांद्रा इथल्या कोर्टात रजिस्टर मॅरेज केलं. लग्नानंतर संध्याकाळी त्यांनी मुंबईतल्या एका स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शनचही आयोजन केलं होतं. याआधी 
सोनाक्षी आणि झहीरच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. झहीर इक्बालची बहीण सनम रतनसीनं सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले होते. हे फोटो सोनाक्षी आणि झहीरच्या मेहंदी कार्यक्रमाचे होते. यात सोनाक्षी जहीरच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत दिसत आहे.