तुमची खर्च करण्याची तयारी आहे? जाणून घ्या ऋतिक रोशन लग्नात नाचण्याचे किती पैसे घेतो

Hrithik Roshan Dance: समाजात आपलं स्टेटस वाढवण्यासाठी अनेक जण बॉलिवूड सेलिब्रेटिंना कार्यक्रमाता बोलवतात. एखाद्या दुकानाचा उद्घाटन सोहळा असू की मग लग्नकार्य सेलिब्रेटी त्यासाठी मोठी फी आकारतात.

राजीव कासले | Updated: May 3, 2023, 11:11 PM IST
तुमची खर्च करण्याची तयारी आहे? जाणून घ्या ऋतिक रोशन लग्नात नाचण्याचे किती पैसे घेतो title=

Hrithik Roshan Films: सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) एका लग्नसोहळ्यात नाचताना दिसतोय. नवरा आणि नवरीबरोबर तो काही डान्स स्टेप्स (Dance on Wedding) करताना दिसत असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. ऋतिक रोशन आपल्या एखाद्या नातेवाईकाच्या किंवा जवळच्या मित्राच्या लग्नात सहभागी झाला असेल असं बोललं जात होतं. 

काय आहे खरं कारण?
ज्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्या लग्नात ऋतिक रोशन पाहुणा म्हणून नाही तर त्याला स्टेजवर नाचण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचा हा जोड व्यवसाय आहे. देशविदेशातील मोठमोठे कार्यक्रम, लग्न, पार्टीमध्ये बॉलिवूड कलाकार सहभागी होतात, यात ते एखादा डान्सही करतात. पण त्यासाठी ते बक्कळ पैसाही घेतात. पण हे कार्यक्रम सामान्य माणसांचे नाही तर करोडपती-अब्जोपतींचे असतात. कारण लाखो-करोडो रुपये मोजून बॉलिवूड कलाकारांना बोलावणं सामान्य माणसाच्या ऐपतीबाहेर आहे.

कोट्यवधींची फी
ऋतिक रोशनचा लग्नात नाचताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची फिस किती असेल याची चाहत्यांना उत्सुकता निर्माण झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार ऋतिक रोशन लग्न, वाढदिवस किंवा पार्टीमध्ये डान्स परफॉरमेंस करण्यासाठी तब्बल अडीच कोटी रुपये चार्ज करतो. हा आकडा ऐकूनच सामान्य माणसाचे डोळे गरगरतील. कारण बॉलिवूड कलाकरांना आपल्या एखाद्या कार्यक्रमात बोलावायचं असेल तर आपला बँक बॅलेंन्सही तितकाच तगडा हवा.

ऋतिक रोशन बॉलिवूडमध्ये अभिनयाबरोबरच त्याच्या डान्ससाठीही ओळखला जातो. त्यामुळे लग्न किंवा एखाद्या कार्यक्रमात डान्स करण्यासाठी ऋतिकला जास्त मागणी असते. ऋतिकबरोबरच शाहरुख खान, सलमान खान या दिग्गज अभिनेत्यांनाही मोठी रक्कम मोजून कार्यक्रमात बोलावलं जातं. अशा कार्यक्रमात परफॉर्म करण्यास कोणताही कमीपणा वाटत नाही, कारण तो आमच्या प्रोफेशनचा भाग असल्याचं शाहरुखने एका मुलाखतीत म्हटलं होतं. 

बँग बँग गाण्यावर डान्स
ऋतिक रोशनचा लग्नातला जो व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यात ऋतिक बँग बँग गाण्यावर नवरा-नवरीबरोबर डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. या कार्यक्रमात ऋतिने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. त्याच्या डान्स स्टेप्सवर लग्नात उपस्थित असलेल्या मंडळीनी ताल धरला होता. 

ऋतिकचा आगामी चित्रपट
दरम्यान, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित फायटर या चित्रपटात ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर सहकलाकार आहेत.  25 जानेवारी 2024 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय यशराज फिल्म्सच्या वार 2 मध्येही ऋतिक चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.