नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता इम्रानहाश्मी शेवटचा बादशाहो चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी बिझनेस केला. त्यानंतर या एका बातमीमुळे इम्ररानपुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. लवकरच इम्ररानभारतीय शिक्षणपद्धतीशी लढताना दिसणार आहे. कारण त्याचा नवीन चित्रपट भारतीय शिक्षणपद्धतीवर आधारित आहे. आणि या चित्रपटाचे नाव चीट इंडिया आहे. याची निर्मिती टी-सीरीज आणि अॅलिप्सिस इंटरटेनमेंटने मिळून केली आहे.
हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सौमिक सेनने केले आहे. या चित्रपटात भारतीय शिक्षणपद्धतीचे दर्शन घडणार आहे आणि देशात शिक्षणाच्या नावाखाली चालत असलेल्या गैरव्यवहारावर भाष्य करेल. या चित्रपटाबद्दल इमरानने सांगितले की, चीट इंडियाची पटकथा आणि शिर्षक खूप शक्तिशाली आहे. आतापर्यंत वाचलेल्या कथांपैकी ही कथा अत्यंत इंटरेस्टिंग आहे. मी भूमिकेसाठी अत्यंत उत्सुक आहे. माझ्या चित्रपट करिअरमधील ही भूमिका अत्यंत वेगळी आणि ऐतिहासिक असेल. मी सौमिकसोबत काम करण्यास अत्यंत उत्सुक आहे.
इम्रानने फोटो शेअर करत एक ट्वीट केले. त्यात त्याने लिहिले की, इम्रान हाश्मी फिल्म्स टी-सीरीज आणि अलिप्सिस इंटरटेनमेंटसोबत 'चीट इंडिया' त काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आणि आनंदी आहे. जे भारतीय शिक्षण प्रणालीच्या सत्य घटनांवर आधारित आहे.
या फोटोत त्याच्या सह भूषण कुमार, तनुज गर्ग व अतुल कासबेकर दिसत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी फेब्रुवारीत प्रदर्शित होईल.
Emraan Hashmi Films is delighted to partner with T-Series and Ellipsis Entertainment on #CheatIndia, a compelling, edge-of-the-seat drama inspired by real incidents in the Indian education system. To be directed by Soumik Sen and slated for a February 2019 worldwide release. pic.twitter.com/hpkZkKXYhf
— emraan hashmi (@emraanhashmi) January 16, 2018