Bigg Boss11 विजेत्या शिल्पा शिंदेला सलमान खानकडून ऑफर

अभिनेता सलमान खान हा अनेक उमद्या कलाकारांसाठी गॉडफादर आहे.

Updated: Jan 16, 2018, 12:58 PM IST
Bigg Boss11 विजेत्या शिल्पा शिंदेला सलमान खानकडून ऑफर   title=

मुंबई  : अभिनेता सलमान खान हा अनेक उमद्या कलाकारांसाठी गॉडफादर आहे.

बिग बॉस दरम्यान सलमान खान अनेकदा शिल्पा शिंदेच्या समर्थनासाठी उभा असलेला दिसला आहे. शिल्पाने विजेतेपद जिंकल्यानंतर सलमानने तिचं कौतुक केलं आणि स्वतःहून तिला एक ऑफर दिली.   

सलमान खानची शिल्पाला ऑफर  

सलमान खानच्या प्रोजेक्टचा भाग होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. परंतू शिल्पाला मिळालेली ऑफर ही प्रोजेक्टसाठी नसून तिच्या न्यायलयीन खटल्यांसाठी होती.  Bigg boss 11 विजेती शिल्पा शिंदेला बड्या कंपनीच्या ब्रॅन्ड अम्बॅसेडरपदाची ऑफर

 

भाभीजी घर पे है मालिकेदरम्यान वाद  

'भाभीजी ...' या हिंदी मालिकेतून शिल्पा शिंदे हे नाव घराघरात पोहचले. तिने निर्मात्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. निर्मात्यांनी हे आरोप फेटाळले आणि शिल्पा मालिकेपासून दूर झाली. या शोच्या दरम्यान शिल्पा शिंदे आणि निर्मात्यांमध्ये वाद रंगले होते. BiggBoss 11 जिंकल्यानंतर शिल्पा शिंदेने घेतला 'हा' मोठा निर्णय

 

शिल्पा शिंदेची माहिती 

शिल्पा शिंदेने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सलमान खानच्या मदतीबाबत खुलासा केला आहे. 'भाभीजी..' वादानंतर शिल्पाला टीव्हीवर काम करण्याला परवानगी नव्हती. तेव्हा अनेकांनी शिल्पाला सलमानला भेटून मदत घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यावेळेस सलमानशी ओळख नसल्याने ते शक्य नव्हते असे शिल्पा म्हणाली. मात्र बिग बॉस संपल्यानंतर सलमान खान स्वतःहून या वादानंतरच्या कायदेशीर बाबींबद्दल माझ्याशी बोलला, काही केस राहिल्या असल्यास मदत करू का ? याबाबत विचारणा केली.