आज्या अन् शितली म्हणतायत 'ईद मुबारक'!

आजवर झी मराठीने प्रत्येक सणाचा आनंद आपल्या प्रेक्षकांसोबत साजरा केलाय. दसरा असो की दिवाळी… गणपती असो की गुढीपाडवा सर्वच सणांचं सेलिब्रेशन इथे आनंदात होताना बघायला मिळतं. आता झी मराठीच्या मालिकेत रमजान ईदचा उत्सव आणि उत्साह बघायला मिळणार आहे.

Updated: Jun 22, 2017, 11:31 AM IST
आज्या अन् शितली म्हणतायत 'ईद मुबारक'! title=

मुंबई : आजवर झी मराठीने प्रत्येक सणाचा आनंद आपल्या प्रेक्षकांसोबत साजरा केलाय. दसरा असो की दिवाळी… गणपती असो की गुढीपाडवा सर्वच सणांचं सेलिब्रेशन इथे आनंदात होताना बघायला मिळतं. आता झी मराठीच्या मालिकेत रमजान ईदचा उत्सव आणि उत्साह बघायला मिळणार आहे.


'लागिरं'ची टीम

'लागिरं झालं जी' या मालिकेत सातारा जिल्हा आणि भारतीय सैन्याचं असलेलं नातं, तेथील तरुणांची स्वप्न आणि ती पूर्ण करण्यासाठीची त्यांची धडपड याची गोष्ट सांगणारी 'लागिरं झालं जी' ही मालिका झी मराठीवर नुकतीच सुरु झाली आहे. विशेषतः मुख्य भूमिकेत असलेले अजिंक्य आणि शीतल हे कमालीचे लोकप्रिय झाले आहेत. त्याचबरोबर राहुल, विकी, यास्मिन, हर्षवर्धन हे सहकलाकारही तेवढीच लोकप्रियता मिळवत आहेत. 

याच मालिकेत आता प्रेक्षकांना ईद साजरी होताना बघायला मिळणार आहे. शीतलची मैत्रीण असलेली यास्मिनच्या घरी सर्व जण रमजान ईदनिमित्ताने एकत्र येणार असून 'ईद मुबारक' म्हणत शिरखुर्माचा आस्वादही घेणार आहेत. येत्या २६ जूनला रमजान ईदच्या दिवशी 'लागीरं झालं जी'चा हा विशेष भाग सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांना 'झी मराठी'वर बघायला मिळणार आहे.