जेवण बनवण्यासाठी शाहिदला खास कॅनडावरुन शेफ

पद्मावतीमध्ये काम करण्यासाठी शाहिद कपूरला खास कॅनडावरुन शेफ मागवावा लागला आहे. 

Updated: Jun 22, 2017, 11:11 AM IST
जेवण बनवण्यासाठी शाहिदला खास कॅनडावरुन शेफ title=

मुंबई  : पद्मावतीमध्ये काम करण्यासाठी शाहिद कपूरला खास कॅनडावरुन शेफ मागवावा लागला आहे. तासन तास जिममध्ये घाम गाळल्यानंतर शाहिद कपूर बनला राजा रतन सिंग, शाहिद कपूरने संजयलीला भन्साळींच्या पद्मावतीसाठी अशी जबरदस्त बॉडी बनवली आहे.

शाहिदने ही बॉडी बनवण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. या रोलसाठी शाहिदने वर्कआऊट व्यतिरीक्त डाएटवर पण फोकस केलं होतं..शाहिद या सिनेमाचं शूट संपतनाही तोपर्यंत कॅनडावरुन आलेल्या एका शेफच्या हातचचं जेवणार आहे.

म्हणजेचं फिटनेसच्या बाबतीत शाहिदने या सिनेमातीचा लीड हिरो रणवीर सिंगलाचं ओपन चॅलेंज दिलं आहे. एवढचं नाही तर पद्मावतीमध्ये रोमान्सच्या बाबतीत पण शाहिदने रणवीरला मागे सोडलं आहे.

राणी पद्मावती बनलेल्या दीपिका पदूकोन बरोबर शाहिद ऑनस्क्रिन रोमान्स करतांना दिसणार आहे..वेल म्हणजेचं बिचाऱ्या रणवीरला यावेळीही ऑनस्क्रिन दीपिकाचा विरह सहन करावा लागणार आहे.