जास्त अंडी खाल्याने होतं नुकसान? आहारतज्ज्ञांनी सांगितलं 'हे' मोठे कारण

Eating Too Much Eggs : जास्त प्रमाणात अंडी खाल्यानं काय होईल आरोग्यावर परिणाम 

दिक्षा पाटील | Updated: Oct 24, 2024, 07:36 PM IST
जास्त अंडी खाल्याने होतं नुकसान? आहारतज्ज्ञांनी सांगितलं 'हे' मोठे कारण title=
(Photo Credit : Freepik)

Eating Too Much Eggs : आपण नेहमी ऐकतो 'सन्डे हो या मन्डे रोज खाओ अंडे'. पण खरंच रोज अंडी खायला हवी का? किंवा दिवसाला किती अंडी खायला हवीत. हा प्रश्न देखील अनेकांना असतो. कारण अर्थातच जास्त अंडी खाल्याचे देखील दुष्परिणाम असतात किंवा आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दिवसाला किती अंडी खायची याविषयी जाणून घेऊया. 

अंड्यामध्ये 'प्रथिने' आणि 'व्हिटामिन डी' मोठ्या प्रमाणात असतात. तुम्ही दिवसातून कमीतकमी 2 उकडलेली अंडी खायला हवीत. अनेकांना अंड्याची चव फार आवडते त्यामुळे अनेकदा ते मर्यादेपेक्षा जास्त अंडी खातात. अंड खाण्याचे अगणित फायदे असले तरी ते मर्यादित प्रमाणात खायला हवं.

जास्त अंडी खाऊ नये? 

खरंतर जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त अंड्याचे सेवन केलं तर तुमचं वजन वाढु शकतं आणि त्यासोबत हृदयाच्या विकाराचा धोकाही निर्माण होऊ शकतो. नोएडा येथिल GIMS हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध आहारतज्ञ आयुषी यादव यांनी याविषयी माहिती दिली आहे. अंड्यात मोठ्या प्रमाणात प्रोटिन असतं. तरी जे लोकं आपलं वजन नियंत्रणात आणायचा प्रयत्न करत आहेत व हृदयाशी निगडीत समस्यांनी त्रस्त आहेत, त्यांनी अंड्याचे सेवन करताना काळजी घेतली पाहिजे.

काही संशोधनामध्ये हे ही समोर आले की जास्त अंडी खाल्यामुळे डायबिटीजचा धोका वाढू शकतो आणि त्यामुळे मेटाबोलिक सिंड्रोमची सुद्धा शक्यता देखिल वाढू शकते. अंडी किती खावी हे सांगत आयुषी यादव यांनी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीच्या आहार गरजा वेगळ्या असु शकतात, तुमच्या गरजेनुसार तुमच्या आहारतज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळोवेळी अंड्याचे प्रमाण नियंत्रित करा आणि तुमच्या आहारात इतर प्रथिन स्तोत्रांचा देखिल समावेश करा. 

हेही वाचा : ऑरीनं 23 किलो वजन कसं कमी केलं? आहारातून काढून टाकले 'हे' पदार्थ

या संशोधनातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की अंडी ही आपल्या शरिरासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असतात. मात्र, हे सगळं प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हाला किती प्रोटिन आणि व्हिटामिन डीची आवश्यकता आहे ते माहित असणं गरजेचं आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)