मानव आधी चंद्रावर आणि मग तिथून मंगळ ग्रहावर जाणार; तिथं गेल्यावर नेमकं काय करणार? NASA चा जबरदस्त प्लान

NASA : 2035 पर्यंत मानव मंगळ ग्रहावर पोहचणार आहे. मंगळावर पोहचण्याआधी चंद्रावर बेस कॅम्प उभारला जाणार आहे. मानव आधी चंद्रावर आणि मग मंगळ ग्रहावर स्वारी करणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 24, 2024, 09:42 PM IST
मानव आधी चंद्रावर आणि मग तिथून मंगळ ग्रहावर जाणार; तिथं गेल्यावर नेमकं काय करणार? NASA चा जबरदस्त प्लान title=

NASA Mars Mission : मंगळ(Mars) ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे. 2035 पर्यंत मानव मंगळ ग्रहावर पोहचेल असा दाव केला जात आहे. मात्र, मंगळ ग्रहावर पोहचल्यावर मनुष्य करणार काय?  अमेरिकन अंतराळ संस्था अर्थात NASA ने जबरजस्त प्लान बनवला आहे. हा प्लान यशस्वी झाल्यास मंगळ मोहिमेतील हा अत्यंत महत्वाचा असा यशस्वी टप्पा ठरणार आहे. 

मंगळ(Mars) ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिक अथक परिश्रम घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून  मंगळ ग्रहावर मानवी वस्ती विकसीत केली जाणार आहे. यासाठीच नासाने मंगळ मोहिम हाती घेतली आहे.  नासाने या मोहिमेला अद्याप कोणतेही नाव दिलेले नाही. मात्र, हा आर्टेमिस मिशनचा पुढचा टप्पा मानला जात आहे. हे मिशन यशस्वी झाल्यानंतर नासा 2026 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याची योजना आखणार आहे.

पृथ्वीपासून मंगळ ग्रह अंदाजे 402 दशलक्ष किलोमीटर दूर आहे.  एका स्पेसशिपला मंगळ ग्रहावर पोहोचण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मंगळ ग्रहावर पाऊल ठेवल्यावर  अंतराळवीर जवळपास 500 दिवस येथे वास्तव्य करतील अशी नासाची योजना आहे. मानवाला मंगळ ग्रहावर जिवंत राहता यावे यासाठी श्वास घेण्यापासून ते त्यांच्या अन्नापर्यंतची व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी नासा वेगवेगळे संशोधन करत आहे. 

मार्स मिशन काय आहे?

आर्टेमिस मिशन हे नासाच्या मंगळ मोहिमेचा प्रारंभिक टप्पा आहे. आर्टेमिस मिशन मिशन अंतर्गत मानवांना चंद्रावर पाठवण्यासाठी डिझाइन केलेला प्रोजक्ट आहे.  या मोहिमेसाठी, नासाने SLS म्हणजेच अंतराळ प्रक्षेपण प्रणाली तयार केली आहे. हे एक शक्तिशाली रॉकेट आहे. याच्या माध्यमातून अंतराळवीरांना मंगळावर नेले जाणार आहे. 2026 मध्ये मानव आर्टेमिस 3 सह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचेल आणि त्यानंतर मंगळावर पोहोचण्याची तयारी केली जाणार आहे.

मानव मंगळ ग्रहावर जाण्यासाठी अंतराळवीर चंद्रावर तळ तयार करणार आहेत.  2026 मध्ये मानव चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. येथे मानवी वस्ती निर्माण केली जाणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील बर्फातून पाणी काढून ते शुद्ध करण्याचे काम केले जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मंगळ ग्रहावर देखील अशाच प्रकारचे संशोधन केले जाणार आहे. 

मंगळ ग्रहावर पोहचल्यावर मानव काय करणार?

मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.  3.8 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी आणि मंगळ एकसारखेच होते. एकेकाळी मंगळ ग्रह हा महासागर, तलाव आणि नद्यांनी वेढलेला होता. मात्र, आता येथे पाणी. मंगळ ग्रहाची अनेक रहस्य मानव उलगडणार आहे. मंगळ ग्रहावर पोहचल्यावर मानव विशिष्ट प्रकारच्या रोव्हरने भ्रमण करणार आहे.