मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या ड्रग्स कनेक्शनमधमध्ये NCB ने २० लोकांना अटक केली आहे. एनसीबीने शनिवारी चौकशीसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला बोलावलं होतं. या दरम्यान अतिशय धक्कादायक बाब समोर आली आहे.
सारा अली खानवर वडिल सैफ अली खान नाराज असल्याचं वृत्त बॉलिवूडलाईफ डॉट कॉमने दिली आहे. सारा अली खानच्या वडिलांनी म्हणजे सैफने तिला या ड्रग्स कनेक्शनमधून वाचवण्यासाठी आपले हात मागे घेतले आहेत. सैफने साराला या प्रकरणात मदत न करण्याच ठरवलं आहे.
रिपोर्टनुसार, चौकशीत साराचं नाव पुढे आल्यावर सैफ अतिशय नाराज झाला. त्यामुळे आपण कोणतीही मदत न करण्याच ठरवलं असल्याचं त्याने सांगितलं.
या प्रकरणात साराचं नाव समोर आल्यामुळे सैफ फक्त सारावरच नाही तर त्याची एक्स पत्नी म्हणजे अभिनेत्री अमृता सिंहवरही रागावलं आहे. यानंतर आता सैफ आणि त्याची गर्भवती पत्नी म्हणजे करिना तैमूरसह दिल्लीला रवाना झाले आहेत.
करिना सध्या लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. जोपर्यंत करिना या सिनेमाचं शुटिंग करणार आहे. तोपर्यं सैफ तिच्यासोबत असेल. सारासाठी हा खडतर काळ आहे यावेळी तिच्यासोबत वडिल नसले तरीही आजी आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर सोबत खंबीरपणे उभी आहे.