बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या 'या' मुलीला ओळखलंत का! अक्षयपासून संजय दत्तपर्यंत अनेकांशी जोडलं नाव

Child Artist : या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलत का कधी करायची बॉलिवूडवर राज्य तर अक्षय आणि संजय पर्यंत अनेक कलाकारांसोबत जोडलं होतं नाव

दिक्षा पाटील | Updated: Nov 26, 2023, 04:53 PM IST
बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या 'या' मुलीला ओळखलंत का! अक्षयपासून संजय दत्तपर्यंत अनेकांशी जोडलं नाव title=
(Photo Credit : Social Media)

Child Artist : सोशल मीडियावर असं ठिकाण आहे जिथे लगेच अनेक गोष्टी व्हायरल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे वेगवेगळे ट्रेंड देखील सुरु असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलीचा फोटो व्हायरल होतोय. ही मुलगी तिच्या काळातील बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. ही दिग्गज अभिनेत्री आजही तिच्या अदांनी सगळ्यांची मने जिंकताना दिसते. तुम्ही फोटो पाहून ही कोण आहे हे ओळखू शकता का? चला एक हिंट देते. या अभिनेत्रीनं अनेक गाजलेले चित्रपट दिले असून ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती तर कधी अक्षय कुमार आणि संजय दत्तसोबत तिचं नाव जोडण्यात आलं होतं. आतातरी तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलंत का? अजूनही तुम्ही ओळखू शकला नाहीत तर चला जाणून घेऊया तिच्याविषयी की कोण आहे ही दिग्गज अभिनेत्री.

ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून रेखा आहे. या फोटोत रेखा या त्यांची आई पुष्पावली यांच्या कुशीत बसल्याचे दिसत आहे. रेखा यांची आई देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर त्यांचे वडील जेमिनी गणेशन हे दिग्गज अभिनेता होते. आई-वडील विभक्त झाल्यानंतर रेखा यांच्यावर आली होती. रेखा यांचं खरं नाव भानुरेखा गणेशन आहे. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी तमिळनाडूतील चेन्नईमध्ये झाला होता. रेखा या गेल्या बऱ्याच काळापासून अभिनय क्षेत्रापासून दूर असल्या तरी वेगवेगळ्या कारणांमुळे त्या नेहमीच चर्चांमध्ये राहतात. 

रेखा यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्या सगळ्यात आधी 'रंगुला रत्नम' या चित्रपटात दिसल्या होत्या. तर बॉलिवूडमध्ये एक अभिनेत्री म्हणून त्या पहिल्यांदा 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सावन भादो' या चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटाच त्यांच्यासोबत अभिनेता नवीन निश्चल महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होती. रेखा यांना त्यांच्या अभिनय क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळाले. इतकंच नाही तर यासाठी त्यांना 2010 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 

हेही वाचा : 'सॅम बहादुरमध्ये' विकी कौशल नाही तर मेघना गुलजारला पाहिजे होता 'हा' लोकप्रिय अभिनेता

रेखा यांच्या कामाप्रमाणेच त्यांच्या खासगी आयुष्याची नेहमीच चर्चा राहिली आहे. त्या कधीकाळी अमिताभ बच्चन यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. तर यांच्याशिवाय त्यांचं नाव हे अक्षय कुमार आणि संजय दत्तसोबत जोडण्यात आलं होतं.