ओळखा कोण आहे ही गोंडस मराठी अभिनेत्री?

 सोशल मीडिया आणि कलाकारांचं एक वेगळं नातं आहे.

Updated: Apr 9, 2021, 05:26 PM IST
ओळखा कोण आहे ही गोंडस मराठी अभिनेत्री? title=

मुंबई :  सोशल मीडिया आणि कलाकारांचं एक वेगळं नातं आहे. कलाकार सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. प्रत्येक चाहता त्याच्या आवडत्या कलाकाराच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतो. कलाकारही चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असतात. कलाकार त्यांच्या बालपनाचे देखील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anvita Phaltankar  (@anvita_phaltankar)

आता देखील सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये प्रेक्षकांच्या मनात राज्य करणारी ही अभिनेत्री कोण असा प्रश्न सर्वांनाचं पडला आहे. तर  ही  अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत स्विटूची भुमिका साकारणारी अभिनेत्री अन्विता फलटणकर आहे. 

फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये तिने 'फोटोतल्या मुलीला जगाची काहीचं पर्वा नव्हती. एक गोष्ट तिला माहित होती की ती हक्का नूडल्सवर प्रेम करते!’असं लिहीलं आहे. आता स्विटू म्हणून प्रेक्षकांची मनं जिकलेल्या अन्विताने टाइमपास आणि गर्ल्स या चित्रपटांमध्ये काम केले आहे.