कोर्टाच्या चकरा मारणाऱ्या Johnny Depp ची संपत्ती माहितीये का? आकडा पाहून डोळे विस्फारतील

जॉनी डेप हे हॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. त्यांनी अनेक चांगल्या आणि मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलंय.

Updated: May 29, 2022, 11:52 AM IST
कोर्टाच्या चकरा मारणाऱ्या Johnny Depp ची संपत्ती माहितीये का? आकडा पाहून डोळे विस्फारतील title=

मुंबई : हॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक जॉनी डेप सध्या त्याच्या कोर्टच्या केसमुळे चर्चेत आहे. जॉनी त्याची एक्स पत्नी आणि एक्वामॅन अभिनेत्री अंबर हर्ड विरुद्ध मानहानीचा खटला लढत आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये हा खटला सुरू होता. आता या खटल्याचा अंतिम निर्णय ज्युरीकडे सोपवण्यात आला आहे.

जॉनी डेप हे हॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. त्यांनी अनेक चांगल्या आणि मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलंय. जगात मान-सन्मान मिळवण्यासोबतच त्याने भरपूर संपत्तीही कमावली आहे. तुम्हाला माहितीये का जॉनी डेपची एकूण संपत्ती किती आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, जॉनी डेपची एकूण संपत्ती 150 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1163 कोटी रुपये आहे. जॉनी हॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. सेलिब्रिटी नेट वर्थनुसार, जॉनी डेप एका चित्रपटात काम करण्यासाठी 20 मिलियन म्हणजेच सुमारे 155 कोटी रुपये घेतो.

जॉनीचं हॉलिवूड हिल्समध्ये घर आहे. 7000 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या या घरात 8 खोल्या आणि 10 बाथरूम आहेत. याशिवाय त्याचे लॉस एंजेलिसमध्ये एक पेंटहाऊस आहे, जे त्याने 7.2 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 55 कोटी रुपयांना विकत घेतलंय.

जॉनी डेपचं बहामासमध्ये स्वतःचं खाजगी आयलँड आहे. या 45 एकर बेटावर त्यांची 156 फुटांची यॉट पण आहे. Vajoliroja असं या यॉटचं नाव आहे. जॉनीचे फ्रान्समध्ये एक घर आहे, ज्यामध्ये 14 बाथरूम, 15 बेडरूम आणि पाहुण्यांसाठी सहा कॉटेजेस आहेत.

एका वेबसाईटच्या माहितीनुसार, जॉनी डेप एका वर्षात 1.8 दशलक्ष डॉलर्स किंवा सुमारे 14 कोटी रुपये त्याच्या बॉडीगार्ड्ससाठी खर्च करतो. एवढंच नाही तर जॉनीकडे 40 फुल टाईम स्टाफ आहे, ज्यांच्या देखभालीसाठी तो दरवर्षी 3.6 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 28 कोटी रुपये खर्च करतो.