मुंबई : दिग्दर्शक विजू माने नुकतचं 'स्ट्रगलर साला'चा तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विजू माने हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. विजून माने सोशल मीडियावर सामाजिक, राजकीय तर कधी मनोरंजन विश्मातील घडामोडींवर त्यांचं मत मांडताना दिसतात. दरम्यान, नुकतीच विजू माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिनेत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आहे.
विजू यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये असलेल्या फोटोमध्ये विजू माने दिसत असून त्यांच्या घरी असलेल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी एकनाथ शिंदे आल्याचे दिसत आहे. 'खरंतर माझ्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाला दरवर्षी ते येतात. पण यावर्षी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते त्यामुळे मनात कितीही वाटत असलं तरी ते येतील का याबद्दल शंका होती. पण खरंच मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे माझ्या घरी आले. मनमोकळ्या गप्पा मारल्या. सोबत खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि माजी महापौर, शिवसेना प्रवक्ते, आमचे मित्र नरेश म्हस्के हेसुद्धा होते,' असे विजू माने यांनी कॅप्शन दिले.
पुढे ते म्हणाले, 'खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी देखील कितीही उशीर झाला तरी माझ्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेण्याची आपली सवय मोडली नाही. ( मला चांगलं आठवतंय गेल्यावर्षी रात्री दीड वाजता खासदार माझ्या घरी आले होते आणि तेव्हाही जवळपास अर्धा तास अत्यंत छान चर्चा झाली होती.) ... प्रत्येक जवळच्या माणसाच्या, कार्यकर्त्याच्या....खरंतर आमंत्रण देणाऱ्या कुणाच्याही घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेणं ही स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेली शिकवण आहे... राजकारणातील उलथापालथ हा प्रत्येकाच्या चर्चेचा आवडीनिवडीचा विषय असतो. '
पुढे विजू म्हणाले,'पण आपल्यासाठी तो माणूस महत्त्वाचा असतो जो आपल्या अत्यंत महत्त्वाच्या वेळेला धावून आलेला असतो. माझ्या बाबतीत मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे ते स्थान आहे. आणि मी कृतज्ञता (मराठीत gratitude) व्यक्त करण्याला कायम प्राधान्य देणारा माणूस आहे. मला शक्य तेव्हा, शक्य तिथे, शक्य त्या कार्यक्रमात मी त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानत असतोच.'
पुढे म्हणाले, 'या शिवाय गेली अनेक वर्ष मी त्यांना ओळखतोय. सामान्य माणसात मिसळून धडाडीनं काम करण्याचा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांच्या धाडसाची बरोबरी करू शकेल असा एकही नेता मी पाहिलेला नाही. (महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली त्यावेळी पुरात उतरून त्या रेल्वेत पोहोचून प्रवाशांना धीर देणं, सांगली कोल्हापूरच्या पुरात अगदी खांद्याइतक्या पाण्यात उतरून पूरग्रस्त लोकांच्या जवळ जाऊन त्यांना मदत करून भविष्यासाठी आश्वस्त करणं आणि सगळ्यात भीतीदायक म्हणजे ज्याकाळी माणूस शिंकला तरी पाचावर धारण बसायची अशा काळात पीपीई किट घालून स्वतः करोना रुग्णांना आधार द्यायला त्यांच्या प्रत्यक्ष जवळ पोहोचणारे नेते किती होते हे आठवून पहा.'
पुढे म्हणाले, 'मी आणि माझा मित्र संदीप वेंगुर्लेकर आम्ही नेहमी म्हणतो, तसं पाहिलं तर आपल्याला सगळेच राजकारणी सारखेच. अनेक पक्षातल्या अनेक नेत्यांशी छान संबंध आहेत. राजकारण त्यांच्या त्यांच्या ठिकाणी असावं पण सन्मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या माणसात अशी काहीतरी जादू आहे की त्यांच्यासाठी आपण 'काहीही' करू शकतो.'