जेव्हा डॉ साबळे नागराज अण्णाच्या भूमिकेत शिरतो

मुंबई : झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा शो दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालला आहे. हा कार्यक्रम फॅमिली शो असल्यामुळे घरातील सर्व मंडळी याला पसंद करतात. चला हवा येऊ द्याच्या आताच्या भागात आपल्याला आताच्या टॉप अभिनेत्री पाहायला मिळत आहेत. या शोमध्ये तेजस्विनी पंडीत, स्पृहा जोशी, प्रार्थना बेहरे आणि रिंकु राजगुरू या अभिनेत्री उपस्थित होत्या. 

यावेळी कार्यक्रमात दिग्दर्शक नागराजची एन्ट्री होते. अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे या कार्यक्रमात येतो. चला हवा येऊ द्याचा दिग्दर्शक आणि लेखक डॉ निलेश साबळे आता नागराज अण्णाच्या भूमिकेत घुसतो. निलेश हुबेहुब नागराज सारखा बोलत आहे. हा व्हिडिओ प्रेक्षकांनी भरपूर पसंत केला असून सध्या हे व्हिडिओ व्हायरल होत आहे. महत्वाच म्हणजे या व्हिडिओत डॉ साबळे अगदी नागराज सारखा डान्स करत असताना दिसत आहे. झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर डॉ साबळे बेफाम होऊन नाचत आहे.