संजय दत्तच्या वडिलांमुळं अनुराग बासूला मिळालेलं जीवनदान; प्रसंग तुम्हालाही रडवेल

आठवणीनं अनुराग भावूक

Updated: Sep 14, 2021, 12:08 PM IST
संजय दत्तच्या वडिलांमुळं अनुराग बासूला मिळालेलं जीवनदान; प्रसंग तुम्हालाही रडवेल  title=
छाया सौजन्य - सोशल मीडिया

मुंबई : ‘सुपर डान्सर – चॅप्टर 4’ (Super Dancer Chapter 4) या कार्यक्रमामध्ये गणोशोत्सव विशेष भागामध्ये अभिनेता संजय दत्त यानं हजेरी लावली. यावेळी स्पर्धकांनी धमाकेदार परफॉर्मन्स सादर करत प्रेक्षकांसह परीक्षकांचीही मनं जिंकली. 

या कार्यक्रमात दिग्दर्शक अनुराग बासू यानं आपल्या जीवनातील अत्यंत भावूक प्रसंगाचा उलगडा केला. यावेळी सुनील दत्त यांच्या आठवणीनं अनुरागला रडू कोसळलं. 

एक वेळ अशी होती, ज्यावेळी सुनील दत्त यांची भेट घेण्यासाठी अनुराग बासू उत्सुक होते. दुर्दैवानं तो दिवस मात्र कधीच आला नाही. सदर घटनेबाबत सांगताना अनुरागला अश्रू अनावर झाले. 

'मी हे यासाठी सांगत आहे की, एकदा जेव्हा मी आजारी होतो (कॅन्सरग्रस्त). त्यावेळी मला रुग्णालांमध्ये बेडच मिळत नव्हता. तेव्हा महेश भट्ट यांनी दत्त साहेबांना फोन लावला. त्यांनी माझ्यासाठी अवघ्या पाचव्या मिनिटाला बेडची सोय केली. मी आज इथे आहे ते त्यांच्यामुळेच. ते दर दोन दिवसांआड मला फोन करत होते, माझ्या तब्येतीबाबत चौकशी करत होते. मी आज जो काही आहे ते त्यांच्यामुळेच. पण दु:ख फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की, त्यांच्याकडे आभार व्य़क्त करण्याची संधीही मला मिळाली नाही. मी खरंच दत्त कुटुंबाचा खूप आभारी आहे.'

जीवनातील अतिशय आव्हानात्मक अशा प्रसंगी दत्त कुटुंबाकडून झालेली मदत अनुराग आजही विसरलेला नाही. किंबहुना तो ही मदत कधीही विसरु शकणार नाही, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.