बॉलिवूड अभिनेत्रीला मातृशोक

काही दिवसांपूर्वीच साजरा केला होता 80 वा वाढदिवस 

Updated: Dec 1, 2019, 12:07 PM IST
बॉलिवूड अभिनेत्रीला मातृशोक  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची आई बेट्टी कपाडिया यांच शनिवारी रात्री उशिरा निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. तब्बेत बिघडल्यानंतर त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा झाला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, डिंपल कपाडिया यांच्या आईला श्वसनाचा त्रास होता. त्या रेस्पिरेटरी या त्रासाशी झुंजत होत्या. काही दिवसांपूर्वी डिंपल कपाडिया यांनी आईची तब्बेत बिघडल्याचं सांगितलं होतं. अनेकदा डिंपल आणि त्यांची मुलगी ट्विंकल खन्ना हॉस्पिटलमध्ये दिसल्या. त्यावेळी अशी देखील चर्चा होती की, डिंपल कपाडिया यांची तब्बेत बिघडली आहे. यावर उत्तर देत डिंपल कपाडिया यांनी आपली आई आजारी असल्याचं सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Grandmother’s 80th with family, friends and loads of laughter #ShilimDiaries

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna) on

मी जीवंत असून मी माझं आयुष्य चांगल जगत आहे. माझ्या आईची तब्बेत ठीक नाही त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल केलं आहे. मला यावर फार काही बोलायचं नाही. आता त्या ठिक आहेत, अशी माहिती दिली होती. 

आजी बेट्टी कपाडिया यांच्या निधनानंतर ट्विंकल खन्ना, अक्षय खन्ना यांच्यासोबत करण आणि इतर कुटुंबियांनी देखील त्यांच अंतिम दर्शन घेतलं. काही दिवसांपूर्वीच बेट्टी कपाडिया यांचा 80 वा वाढदिवस साजरा केला. ट्विंकल खन्नाने याचे काही फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. या सेलिब्रेशन करता संपूर्ण कुटुंबिय हिल्टन रिजॉर्ट्स एँड स्पा, शिलिम येथे गेले होते.