Dimple Kapadia Gadar 2 : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटानं 12 दिवसात बॉक्स ऑफिसवर 399.60 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच 400 कोटींचा आकडा पार करणार आहे. देशात सनी देओलच्या या चित्रपटाला खूप यश मिळत असताना दुसरीकडे परदेशात हा चित्रपट चांगली कमाई करू शकला नाही. याच चित्रपटासोबत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा 'ओह माय गॉड 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटगृहात हे दोनही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. त्यासगळ्यात आता 'गदर 2' मध्ये स्क्रीनिंग करण्यात आली होती. यावेळी तिथे डिंपल कपाडिया यांना स्पॉट करण्यात आलं होतं. तिथून बाहेर पडत असलेल्या डिंपल कपाडिया यांनी पापाराझींना फोटो काढण्यासाठी पोझ देण्यास नकार दिला.
डिंपल कपाडिया या अक्षय कुमारच्या सासू आहेत. तर डिंपल कपाडिया आणि सनी देओल ही कधीकाळी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यात आता डिंपल आणि सनी देओल हे एकदिवस आधीच मुंबई विमानतळावर ते एकत्र दिसले होते. तर सोमवारी त्या वांद्रे येथे असलेल्या Gaiety Galaxy या थिएटर बाहेर स्पॉट झाल्या. त्यावेळी डिंपल यांनी पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि काळ्या रंगाची टोपी परिधान केली होती. डिंपल कपाडिया जेव्हा थिएटरमधून बाहेर आल्या तेव्हा त्याचे फोटो काढण्यासाठी पापाराझी पुढे आले असताना. डिंपल कपाडीया यांनी पोझ देण्यास नकार दिला. त्या थेट गाडीत जाऊन बसल्या.
डिंपल यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की, गदर 2 हा बॉयफ्रेंडचा चित्रपट आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, प्रेमीचा चित्रपट पाहिला की जावयाचा. तिसरा नेटकरी म्हणाला, ती का सनी देओलची बकेट हॅट वापरते. आणखी एक नेटकरी म्हणाला की 'नक्कीच गदर 2' पुढे अनेक नेटकऱ्यांनी सनी देओलची टोपी का घेतली असा सवाल केला आहे.
हेही वाचा : सलमान खानच्या 'हिट अँड रन केस'मुळंच माझा... अमीषा पटेलच्या वर्तव्यामुळं एकच खळबळ
सनी देओल आणि डिंपल कपाडिया विषयी बोलायचे झाले तर 80 च्या दशकात ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यावेळी डिंपल कपाडिया यांचे लग्न झाले होते तरी देखील त्या रिलेशनशिपमध्ये आहेत असे म्हटले जात होते. त्या दोघांनी 'आग का गोला', 'मंजिल मंजिल' आणि 'नरशिम्हा' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यानंतर ते दोघं जवळ आले. खूप वर्षांपूर्वी त्या दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोत त्या दोघांनी एकमेकांचा हाथ धरल्याचे दिसले आहे.