मुंबई : गेल्या दोन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरचा 'संजू' हा सिनेमा धुमाकूळ घालत होता. आतापर्यंत या सिनेमाने 300 करोड रुपयांची कमाई केली आहे. संजू या सिनेमाने आतापर्यंत बॉलिवूडमधले अनेक रेकॉर्ड तोडून नवीन विक्रम रचला आहे. असं सगळं असताना आता मात्र 'संजू' या सिनेमाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. दिलजीत दोसांझ यांच्या 'सूरमा' या सिनेमामुळे लागणार ब्रेक. दिलजीत दोसांझ आणि तापसी पन्नूचा 'सूरमा' हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. 'सूरमा' हा सिनेमा भारतीय हॉकीचे माजी कॅप्टन संदीप सिंह यांच्यावर आधारित आहे. यामध्ये संदीप सिंह यांचा संघर्षाचा काळ दाखवला आहे.
'सूरमा' या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग गुरूवारी करण्यात आलं. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. अशावेळी चर्चा होती की आता सूरमा हा सिनेमा 'संजू' च्या कमाईला ब्रेक लावणार आहे. 29 जून रोजी प्रदर्शित झालेल्या 'संजू' सिनेमाने अनेक आठवडे बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. तसेच या दिवसांत कोणताही दुसरा सिनेमा प्रदर्शित न झाल्यामुळे त्याचा फायदा संजूला झाला. आतापर्यंत या सिनेमाने 295 करोड रुपयांचा आकडा गाठला आहे.
त्यामुळे आता या आठवड्यात 'संजू' हा सिनेमा 'सूरमा'ला टक्कर देतो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सूरमा हा सिनेमा हॉकी लेजेंड संदीप सिंह यांच्या आयुष्यावरील बायोपिक आहे. दिलजीत संदीप सिंहची भूमिका साकारत आहेत. शाद अलीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.