Dilip Kumar Death : दिलीप कुमार यांना ब्रिटिशांविरोधात भाषण दिल्यामुळे झाली होती अटक

ज्येष्ठ अभिनेते  दिलीप कुमार यांचं बुधवारी सकाळी 7.30 सुमारास निधन झालं. 

Updated: Jul 7, 2021, 08:45 AM IST
Dilip Kumar Death : दिलीप कुमार यांना ब्रिटिशांविरोधात भाषण दिल्यामुळे झाली होती अटक title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते  दिलीप कुमार यांचं बुधवारी सकाळी 7.30 सुमारास निधन झालं. ते 98 वर्षांचे  होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना आणि समस्त कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. आता त्यांच्या निधनानंतर अनेक जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहत आहेत. चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यापुर्वी  त्यांनी पैसे कमावण्यासाठी प्रचंड खस्ता खाल्ला. 

दिग्गज अभिनेता Dilip Kumar का निधन, बॉलीवुड में पसरा मातम

एकदा तर ते घरात भांडण झाल्यामुळे मुंबईतून पळून ते थेट पुण्यात पोहोचले.  त्यानंतर पुण्यातील ब्रिटिश आर्मी कॅंटीनमध्ये काम करू लागले. कॅंटीनमध्ये त्यांने बनवलेले  सँडविच प्रचंड प्रसिद्ध होते. हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता आणि देशावर इंग्रजांचे राज्य होते. दिलीपकुमार यांनी पुण्यात एके दिवशी भाषण केले. भाषणात ते म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्याचा लढा योग्य आहे आणि ब्रिटीश राज्यकर्त्यांचं शासन चुकीचे आहे.

बातमी : http://BREAKING : Dilip Kumar Death : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

दिलीप कुमार त्यांच्या 'दिलीप कुमार - द सब्सटांस एन्ड द शॅडो' पुस्तकात म्हणतात की, 'इंग्रजांविरोधात भाषण केल्यामुळे मला येरवाडा जेलमध्ये पाठवण्यात आलं. जेथे अनेक सत्याग्रही कैद होते. तेव्हा सत्याग्रहांना गांधीवाले म्हणायचे. सकाळी माझ्या ओळखीचे एक मेजर आले तेव्हा मला तुरूंगातून सोडण्यात आले. ' दिलीप कुमार यांचे अनेक असे किस्से आहेत जे आजही तुफान चर्चेत असातात. त्यापैकी एक हा किस्सा.