Dilip Kumar Death : ट्रेजेडी किंग दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या लव्हस्टोरीत कोण बनलं खलनायक?

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडूनही दिलीप कुमार-मधुबाला कधीच आले नाहीत एकत्र 

Updated: Jul 7, 2021, 08:52 AM IST
Dilip Kumar Death : ट्रेजेडी किंग दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या लव्हस्टोरीत कोण बनलं खलनायक?  title=

मुंबई : ट्रेजेडी किंग नावाने लोकप्रिय असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं आज 98 व्या वर्षी निधन झालं आहे. दिलीप कुमार हे बॉलिवूडमधील लोकप्रिय नाव. दिलीप कुमार हे आपल्या अभिनयाप्रमाणेच लव्ह लाईफमुळे देखील खूप चर्चेत होते. दिलीप कुमार आणि मधुबाला (Madhubala) यांची लव्हस्टोरी ही त्या काळातील अतिशय लोकप्रिय लव्हस्टोरी होती. (Dilip Kumar Death : Dilip Kumar and Madhubala was in 9 years relationship Love Story, Didi not turn in Marriage ) या लव्हस्टोरीचे अनेक किस्से आजही चर्चेत आहेत. 

दिलीप कुमार आणि मधुबाला यांची ऑन स्क्रीन प्रेम कहाणी कधी त्यांच्या रिअल लाईफमध्ये आली हे त्यांना कळलं देखील नाही. प्रेमात आकंठ बुडालेल्या या जोडीला जेव्हा याची जाणीव झाली तेव्हा 9 वर्षे झाली होती. (BREAKING : Dilip Kumar Death : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन) 

 

मधुबाला आणि दिलीप कुमार यांना चाहते रिअल लाइफमध्ये देखील एकत्र पाहण्यास उत्सुक होते. मात्र या दोघांच्या प्रेमात आडवं आलं तो म्हणजे त्यांचा 'हट्ट.' त्यांच्या दोघांमधील हट्ट इतका शक्तीशाली होता की, त्याने खऱ्या प्रेमाला देखील मागे टाकलं. एकमेकांवर अतोनात प्रेम करणारे दोघं हट्टापाई एकमेकांपासून वेगळे झाले. (Dilip Kumar Death : या समस्येने त्रस्त होते दिलीप कुमार; वाचा लक्षणं) 

 

मीडिया रिपोर्टननुसार, 'नया दौर' या सिनेमाचं शुटिंग ग्वालियरमध्ये सुरू होतं. शुटिंग दरम्यान काही गुंडांनी महिलांसोबत असभ्य वर्तन ककेलं. यामुळे मधुबाला यांचे वडिल खूप हैराण झाले. त्यांनी सिनेमाच्या शुटिंगचं लोकेशन बदलण्याची मागणी केली. मात्र यासाठी दिलीप कुमार आणि दिग्दर्शक तयार नव्हते. अगदी हे प्रकरण कोर्टात गेलं. त्यावेळी दिलीप कुमार यांनी दिग्दर्शकाची साथ दिली. याचमुळे दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या दरी निर्माण झाली. दोघांचं हट्ट या नात्याला संपवण्यास कारणीभूत ठरला. 

एकदा दिलीप कुमार यांनी खुलासा करताना मधुबाला यांच्या वडिलांवर गंभीर आरोप केले होते. 'लग्नाला व्यापार बनवण्याचा प्रयत्न होता.' असा आरोप दिलीप कुमार यांनी मधुबाला यांच्या वडिलांवर केला होता. वडिलांनी मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या नात्यात हस्तक्षेप केल्यामुळे यांच्यातील गैरसमज वाढतच गेले आणि नात्यात दुरावा आला. (Dilip Kumar Death : दिलीप कुमार यांना ब्रिटिशांविरोधात भाषण दिल्यामुळे झाली होती अटक) 

 

दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यात एवढा दुरावा आला की, एकमेकांसोबत काम करूनही संवाद मात्र शून्य होता. मधुबाला यांना मनापासून वाटत होतं की, दिलीप कुमार यांनी त्यांची माफी मागावी. 

मधुबाला यांची बहिण मधुर यांनी सांगितलं होतं की,'या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. दिलीप कुमार यांनी मधुबाला यांना आपल्या वडिलांना सोडण्याचा सल्ला दिला होता.' त्यावेळेला मधुबाला यांचं एकच उत्तर होतं,'माझ्या वडिलांची माफी मागा. मी लग्नाला तयार आहे.' अशा पद्धतीने दोघंचं खूप प्रेम असूनही हे दोघं कधी एकत्र आले नाहीत. 

मधुबाला यांना दिलीप कुमार आपल्याशी कधीच लग्न करणार नाहीत याची जाणीव झाली होती. त्यामुळे त्यांनी किशोर कुमार यांचं प्रपोझल मान्य केलं आणि त्यांच्याशी लग्न केलं. पुढे दिलीप कुमार यांनी सायरा बानोशी लग्न केलं.