दिलीप जोशी नाही तर हा अभिनेता करणार होता जेठालालची भूमिका, नाव ऐकून बसेल धक्का

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही कॉमेडी मालिका 2008 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

Updated: Aug 25, 2022, 07:07 PM IST
दिलीप जोशी नाही तर हा अभिनेता करणार होता जेठालालची भूमिका, नाव ऐकून बसेल धक्का title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही कॉमेडी मालिका 2008 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा शो आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या टीव्ही सीरियलमध्ये जेठालाल ते दया बेन आणि बबिता जी सारख्या पात्रांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. पण तुम्हाला माहीतीये का की, या शोमधील 'जेठालाल' या व्यक्तिरेखेसाठी दिलीप जोशी ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. होय, मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांना या भूमिकेसाठी राजपाल यादवला कास्ट करायचं होतं, परंतु काही कारणांमुळे त्यांनी शो नाकारला आणि दिलीप जोशीचे नशीब फिरले.

उत्कृष्ट कॉमिक टायमिंगसाठी प्रेक्षकांच्या टाळ्या लुटणाऱ्या राजपाल यादवनं जेठालालची भूमिका साकारण्यास नकार दिला. रिपोर्टनुसार, निर्माते स्क्रिप्ट घेऊन राजपाल यादव यांच्याकडे पोहोचले, पण राजपालनं शोमध्ये काम करण्यास नकार दिला.

राजपालनं असे का केले याचा खुलासा त्यानं एका मुलाखतीत केला होता. अभिनेत्यानं सांगितलं की, 'त्याला अशा भूमिकेत काम करायला आवडते, जी केवळ त्याच्यासाठीच लिहिलेली आहे. ऑप्शन रोलमध्ये, ज्यामध्ये कोणालाही निश्चित करता येईल, असे काम करणे त्याला आवडत नाही.'

जे काही त्याच्या नशिबात असते ते त्याला मिळते असे म्हणतात. बघा ना राजपालने ही भूमिका नाकारली आणि हे पात्र दिलीप जोशींना मिळाले. चित्रपटांमध्ये साईड रोल करत असलेला दिलीप या शोमध्ये येण्यापूर्वी आर्थिक समस्यांशी झुंजत होते. ही भूमिका मिळाल्यानंतर त्यांचं जह बदललं. 

अनेक कलाकारांनी एकापाठोपाठ एक शो सोडल्याने निर्मात्यांची तसेच चाहत्यांची निराशा झाली आहे. त्याचबरोबर या शोमध्ये अनेक नवे चेहरे देखील दिसत आहेत, जे हळुहळू चाहत्यांची मने जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्याच वेळी, चाहते देखील शोवर त्यांचे प्रेम कायम ठेवत आहेत.