'खंडेराया झाली माझी दैना' या गाण्यातील अभिनेत्रीबद्दल...

पाहा ईशाचे बोल्ड फोटो 

 'खंडेराया झाली माझी दैना' या गाण्यातील अभिनेत्रीबद्दल... title=

मुंबई : तेजस पाटील दिग्दर्शित वैभव लोंढंने गायलेलं 'खंडेराया झाली माझी दैना'हे गाणं संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. पहिल्याच दिवशी या गाण्याला एका लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं असून याची जादू सगळीकडे आहे. मराठीत 'जाऊ दे न व...''  हे गाणं सर्वांच्या ओठी होतं, यानंतर  खंडेराया माझी झाली दैना, हे गाण हिट होतं आहे. 

या गाण्यातील अभिनेत्री सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. या तरूणीचं नाव आहे ईशा पाठक (साईशा) ईशा पुण्यात वाढलेली मुलगी असून पुण्यातील भारती विद्यापीठातून तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. २०१५ साली ” महाराष्ट्र श्रावण क्वीन ” चा ‘किताब ईशा पाठकने पटकावला होता. काही ब्रँडसाठी तिने मॉडेलिंगही केले आहे. नृत्याची आवड असल्याने तिने स्वाती दैठकर यांच्याकडून नृत्याचे धडे गिरवले आहेत. क्लासिकल डान्समधून तिने नुकतीच मास्टरची डिग्री प्राप्त केली आहे.

गाय, कंपोजर वैभव लोंढे यांच्याच ‘भिजलेली तू’ या गाण्यात तिला पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली होती. या गाण्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. गायक, गीतकार ओळखले जाणारे वैभव लोंढे यांच्या आवाजात ‘खंडेराया झाली माझी दैना’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुती असलेल्या या गाण्याची निर्मिती चेतन गरुड प्रॉडक्शनने केली आहे. यापूर्वीही वैभव लोंढे यांनी सुपरहिट मराठी गाणी दिलीत. “सांग दुसरा कोण” “प्रेमयाच्या ह्या खुणा” आणि “झकास तू” अश्या नेहमी गुणगुणत राहाव्या अश्या गाण्याची निर्मिती त्याने केली.