नोराच्या फॅन्सना धक्का, नोरासोबत अचानक असं कसं घडलं?

या बातमीमुळे नोराचे चाहाते नाराज झाले आहेत. कारण नोराला त्यांना सोशल मीडियावरती पाहाता येणार नाही.

Updated: Feb 4, 2022, 08:18 PM IST
नोराच्या फॅन्सना धक्का, नोरासोबत अचानक असं कसं घडलं? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचे अनेक चहाते आहेत. नोराने तिच्या डान्स आणि लूक्सने लोकांना भूरळ पाडले आहे. नोरा सोशल मीडियावरती फारच ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी काही ना काही सोशल मीडियावरती शेअर करत असते. चाहते देखील फार कुतुहलाने नोराचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर आणि लाईक्स करतात. इतकेच काय तर लोक तिच्या पोस्ट खाली कमेंट्स करायला देखील विसरत नाही. नोराने कोणातीही पोस्ट टाकू देत. तासाभरात त्याच्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडतो.

परंतु आता नोराच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. नोरा आता सोशल मीडियावरुन गायब झाली आहे. हो हे खरं आहे.

आज म्हणजे शुक्रवार तुम्ही जर इंस्टाग्रामवरती तिचं खातं शोधलात तर तुम्हाला ते दिसणार नाही. ऐवढंच काय तर तुम्ही नोराचा एखादा व्हिडीओ सेव्ह केला असेल आणि तो पाहण्यासाठी ओपन केलात, तरी तो ओपन होत नाही.

या बातमीमुळे नोराचे चाहाते नाराज झाले आहेत. कारण नोराला त्यांना सोशल मीडियावरती पाहाता येणार नाही.

मात्र, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या बातमीमुळे त्याचे चाहते खूप दुःखी दिसत होते. जर आपण तिच्या फॅन फॉलोइंगबद्दल बोललो तर तिचे इंस्टाग्रामवर 37 मिलियन पेक्षा जास्त फॉलोइंग होते.

ही होती शेवटची पोस्ट

नोरा सध्या दुबईमध्ये सुट्टीवर आहे आणि अभिनेत्री तिच्या सुट्टीतील नियमित अपडेट्स शेअर करत आहे. तिची शेवटची पोस्ट एक व्हिडीओ होता ज्यात ती सिंहाला खायला घालताना दिसली होती. यापूर्वी, नोरा तिच्या हाताने सिंहाला मांसाचा तुकडा खाऊ घालताना दिसली होती ज्याने चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. परंतु आता तिचे इंस्टाग्राम बंद असल्यामुळे लोकांना ती काय करतेय हे पाहाता येणं शक्य होणार नाही.

नोराचं अकाउंट तिने स्वत: बंद केलंय की काही तिला फेसबुककडून फटका बसलाय हे काही कळलेलं नाही. परंतु लवकरत नोरा पुन्हा एकदा इंस्टावरती दिसेल अशी अपेक्षा आहे.